Sunday, 29 April 2012

सर्वांगीण विकासासाठी अहंकार न्यून करणे आवश्यक आहे......

मी झालो ऐसे म्हणे । तो काहीच नेणे ।।

ज्ञानेश्वर माउलींच्या या उक्तीवरून... मनुष्यातील ‘मी’ पणाची, म्हणजे अहंची व्यर्थता लक्षात येते.... अहंकार हा मनुष्याच्या ऐहिक, तसेच पारमार्थिक सुखाच्या मार्गातील एक मोठा धोंडा आहे..... अहंकारचे बीज हे मनुष्यजन्मातच असल्याने लहान- थोर, गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित इत्यादी सर्वांमध्येच तो कमीजास्त प्रमाणात का होईना.... पण असतोच..... 

व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांसाठी सुद्धा अहंकार हा आत्मघातकी ठरल्याची अनेक उदाहरणे देता येतील... अनेक धनिकांच्या आस्थापनाच्या आस्थापना.... अहंकारामुळे नष्ट झाल्याची पुष्कळ उदाहरणे सापडतील.....

अनेक राजकीय नेत्यांच्या अहंकारामुळे सामान्य प्रसंग ताणले जाऊन लोकसभेचे /विधानसभेचे कामकाज स्थगित ठेवण्याची नामुष्की आल्याचेही आपण पाहिले आहे..... तसेच  अहंकार आणि स्वाभिमान यांची गल्लत होऊ नये….. स्वाभिमानामुळे आपली मान ताठ राहते….. पण अहंकारामुळे गुर्मी येते….. ही गुर्मी संघ भावनेच्या मुळावर घाला घालते……

त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी अहंकार न्यून करणे आवश्यक असते......

अहंकार शेतात उगवणार्‍या तणासारखा असतो..... जोपर्यंत आपण तण समूळ नष्ट करत नाही.... तोपर्यंत चांगले पीक हाती लागत नाही..... सतत त्या तणाची कापणी करावी लागते.....

अहंकारी होण्यासाठी कोणतेही कारण पुरते….. रूप, पैसा, सत्ता, बुद्धीमत्ता किंवा जी दुसर्‍याकडे नाही…. ती आपल्याकडे आहे अशी कोणतीही गोष्ट डोक्यात चढते…..

हा अहंमन्यपणा माणसाला उद्धट बनवते.... व आपल्यासारखा शहाणा कोणी नाही हा विचार दुसर्‍याबद्दल तुच्छता निर्माण करतो..... या तुच्छतेमुळे माणसांमध्ये सुसंवाद तर राहोच.... पण एकमेकांशी सुसंवादही होत नाही......

हा अहंकार नष्ट करण्यासाठी अहंनिर्मूलनाचे प्रयत्न करण्याला पर्याय नाही.....

जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रात काम करतो.... त्यावेळी  आपल्याला एकत्र काम करता आले पाहिजे.... त्या कामाविषयी तळमळ, कर्तृत्वाविषयी अभिमान व भरभराटीची ओढ असायला हवी.....अहंकार नको.... त्या शिवाय प्रगतीची घोडदौड चालू राहाणार नाही..... 

परंतु एकमेकांशी मिळून मिसळून.... खेळीमेळीने काम करण्यासाठी एकमेकांच्या अभिमानाचे रूपांतर अहंकारात होणार तर नाही ना.... याची खबरदारी प्रत्येकानेच घ्यायला हवी.....

यासाठीच अहंकार संपवा... न्यून करा... स्वतःची प्रगती करा...  सर्वांगीण विकास साधा..... तुमच्यात थोडाही  अहंकार / उद्धटपणा येऊ देऊ नका....  फक्त निर्मळ, नैर्सार्गिक व साधेपणाने राहा.....

ॐ श्री गुरुदेव दत्त ......

No comments:

Post a Comment