Sunday 29 April 2012

सर्वांगीण विकासासाठी अहंकार न्यून करणे आवश्यक आहे......

मी झालो ऐसे म्हणे । तो काहीच नेणे ।।

ज्ञानेश्वर माउलींच्या या उक्तीवरून... मनुष्यातील ‘मी’ पणाची, म्हणजे अहंची व्यर्थता लक्षात येते.... अहंकार हा मनुष्याच्या ऐहिक, तसेच पारमार्थिक सुखाच्या मार्गातील एक मोठा धोंडा आहे..... अहंकारचे बीज हे मनुष्यजन्मातच असल्याने लहान- थोर, गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित इत्यादी सर्वांमध्येच तो कमीजास्त प्रमाणात का होईना.... पण असतोच..... 

व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांसाठी सुद्धा अहंकार हा आत्मघातकी ठरल्याची अनेक उदाहरणे देता येतील... अनेक धनिकांच्या आस्थापनाच्या आस्थापना.... अहंकारामुळे नष्ट झाल्याची पुष्कळ उदाहरणे सापडतील.....

अनेक राजकीय नेत्यांच्या अहंकारामुळे सामान्य प्रसंग ताणले जाऊन लोकसभेचे /विधानसभेचे कामकाज स्थगित ठेवण्याची नामुष्की आल्याचेही आपण पाहिले आहे..... तसेच  अहंकार आणि स्वाभिमान यांची गल्लत होऊ नये….. स्वाभिमानामुळे आपली मान ताठ राहते….. पण अहंकारामुळे गुर्मी येते….. ही गुर्मी संघ भावनेच्या मुळावर घाला घालते……

त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी अहंकार न्यून करणे आवश्यक असते......

अहंकार शेतात उगवणार्‍या तणासारखा असतो..... जोपर्यंत आपण तण समूळ नष्ट करत नाही.... तोपर्यंत चांगले पीक हाती लागत नाही..... सतत त्या तणाची कापणी करावी लागते.....

अहंकारी होण्यासाठी कोणतेही कारण पुरते….. रूप, पैसा, सत्ता, बुद्धीमत्ता किंवा जी दुसर्‍याकडे नाही…. ती आपल्याकडे आहे अशी कोणतीही गोष्ट डोक्यात चढते…..

हा अहंमन्यपणा माणसाला उद्धट बनवते.... व आपल्यासारखा शहाणा कोणी नाही हा विचार दुसर्‍याबद्दल तुच्छता निर्माण करतो..... या तुच्छतेमुळे माणसांमध्ये सुसंवाद तर राहोच.... पण एकमेकांशी सुसंवादही होत नाही......

हा अहंकार नष्ट करण्यासाठी अहंनिर्मूलनाचे प्रयत्न करण्याला पर्याय नाही.....

जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रात काम करतो.... त्यावेळी  आपल्याला एकत्र काम करता आले पाहिजे.... त्या कामाविषयी तळमळ, कर्तृत्वाविषयी अभिमान व भरभराटीची ओढ असायला हवी.....अहंकार नको.... त्या शिवाय प्रगतीची घोडदौड चालू राहाणार नाही..... 

परंतु एकमेकांशी मिळून मिसळून.... खेळीमेळीने काम करण्यासाठी एकमेकांच्या अभिमानाचे रूपांतर अहंकारात होणार तर नाही ना.... याची खबरदारी प्रत्येकानेच घ्यायला हवी.....

यासाठीच अहंकार संपवा... न्यून करा... स्वतःची प्रगती करा...  सर्वांगीण विकास साधा..... तुमच्यात थोडाही  अहंकार / उद्धटपणा येऊ देऊ नका....  फक्त निर्मळ, नैर्सार्गिक व साधेपणाने राहा.....

ॐ श्री गुरुदेव दत्त ......

Thursday 26 April 2012

स्वतःला ओळखा... जीवनात फक्त चालू नका.. भरारी घ्यायला शिका ..... 

एक राजा होता.... त्याला दोन सुंदर बहिरी ससाणा पक्षी भेट मिळाले... इतके छान ससाणा पक्षी त्याने पहिले नव्हते..... पक्षी लहान होते... पक्षी त्याने त्याच्या पक्षी शिक्षकाकडे ट्रेनिंग साठी पाठीवले..... असाच एक महिना गेला...

एक दिवस पक्षी शिक्षक राजाकडे आला व म्हणाला... कि दोघांपैकी एक ससाणा आकाशात छान झेपावतो.... उंचच उंच भरारी घेतो .... विहार करतो.... पण दुसरा ससाणा काही उडत नाही..... इथे आल्या पासून तो एकाच फांदीवर बसून आहे ..... राजाने लगेच उत्तमोत्तम पक्षी तज्ञ, पक्षी डॉक्टर बोलाविले.... पण कोणीच त्या ससाण्याला उडायला शिकवू शकले नाहीत .....

राजाने हा प्रश्न दरबारात ठेवला व मंत्र्याना उत्तर शोधण्यास सांगितले..... दुसऱ्या दिवशीही ससाणा फांदीवरच बसून होता ... राजाला कळले कोणालाच उत्तर मिळालेले नाही.... शेवटी राजाने विचार केला कि एखाद्या निसर्गाच्या जवळ असलेल्या, निसर्ग ओळखणाऱ्या व्यक्तीला हे काम देऊया... 

त्याने एका गावातल्या हुशार शेतकऱ्याला बोलावले..... दुसऱ्या दिवशी राजा एकदम आश्चर्य चकित झाला... दुसरा ससाणा देखील आकाशात मस्तपणे विहार करत होता ..... राजा खुश झाला त्याने शेतकऱ्याला हे कसे केले विचारले.... शेतकरी म्हणाला ..... हे फारच सोपे होते.... मी फक्त तो बसलेला फांदी कापली....

आपले देखील असेच असते... आपण सर्वजन उंचच उंच भरारी घेऊ शकतो..... पण आपल्याला आपणातील नैसर्गिक क्षमतांची माहिती नसते..... आपण फक्त असेच एका फांदीवर बसून राहतो.... नवीन काही करायला भितो... घाबरतो .... व आपल्याच माहित असलेल्या गोष्टीमध्ये अडकतो... नवीन काही शिकत नाही....

आपण आपल्या क्षमता, कौशल्य, बुद्धिमत्ता यांचा पुरेपूर वापर करत नाही..... स्वःताचा सर्वांगीण विकास करत नाही..... खूपवेळा आपणच आपल्या क्षमता, कौशल्य ओळखत नाही..... किंवा जाणून घेत नाही ....

आपण संसारात साचेबद्ध, निरर्थक असे आयुष्य जगतो .... जेव्हा कि आपण स्वःताला ओळखून परिपूर्ण, अर्थपूर्ण व आनंदी असे राहू शकतो.... आपल्याला मिळालेल्या या मानवी देहाचे सार्थक करा.... स्वःताला ओळखण्याचा प्रयत्न करा......

तर मग चला आपली क्षमता कळण्यासाठी आपण ज्याला चिकटून बसतो.... ती फांदी तोडायलाच पाहिजे.....  हि भीतीची फांदी कापायला शिका व ज्ञानाकडे भरारी घ्या आणि जीवनात मुक्तपणे विहार करण्याचा आनंद लुटा.....

ॐ श्री गुरुदेव दत्त .......

Wednesday 25 April 2012

What are you doing..... Work or Serve …..
One evening a Swamiji .... of Sri Ramakrishna Mutt was addressing the participants of an MNC company on the concept of work culture......

One of the participants asked the following question to the Swamiji : I am a senior manager of Materials Department ..... and I joined an organization 25 years ago as an Engineer Trainee .... and over the last 25 years I have gone through every experience in the organization ..... and I am now the senior manager looking after the material function independently......

During the initial part of my career..... the job was very challenging and interesting...... Every day was exciting and I looked forward to each day with lot of interest.... However, all those exciting days are gone ..... since I do not find my job any more interesting...... because there is nothing new in my job......

As I have seen and handled every conceivable situation.... there is no more challenges in my work..... I am now feeling bored because I am doing a routine job.....

However..... Swamiji ..... I am living in the same house for over forty years..... I am the son for the same parents for over forty five years.... I am the father for the same children for the past ten years and the husband for the same lady for the past twenty years......

In these personal roles I do not feel bored ..... and the passage of time has not taken away the zeal from me..... Please tell me why I am bored of the routine in the office and not in the house....?

This was a very interesting Question.... and we were all very anxious and curious to know what the Swamiji had to say..... The response from him was very interesting and convincing.....

He asked the executive the question..: Please tell me for whom does your wife and the mother of children cook..... ?
The executive replied that obviously my wife cooks for.... all of us -the family..... Then the Swamiji said..... that because the wife.... 'Serves' ..... others..... and because of this service mindedness ..... she is not feeling tired or bored...... Similarly, when you are at Home you are not perceiving your role as the necessary work......

But in an office ...... we 'Work' and not 'Serve'......

Anything we consider...... as Service will not make us feel bored...... That is difference between....... Serving and Working.....

He asked the executive to consider his work as..... Service and not merely a Work....

So what conclusion is ...... When you serve others.... you gain some perspective on the world and stop nitpicking your life..... You begin to appreciate all that you have in your life..... and enjoy happy life....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....
मुक्तविहार व बंधविहार ......

एक पक्षी आकाशात विहार करीत होता..... तो एका झाडावर बसला होता.... तेथे त्याला एक खाद्य पदार्थ मिळाला.... तो आनंदित झाला..... तो पदार्थ चोचीत धरुन पुन्हा आनंदाने विहार करु लागला.....
आकाशात इतर पक्षीही उडत होते..... ते लगेच त्या खाद्यपदार्थासाठी त्याच्या मागे लागले.....

हळुहळु बरेच पक्षी त्यात सामील झाले..... आता कर्कश्य आवाजात सारे जण त्या पदार्थासाठी त्याचा पाठलाग करु लागले.... तो पदार्थ चोचीत धरलेला पक्षी घाबरला..... चोच उघडुन ओरडुही शकत नव्हता.... कारण पदार्थ खाली पडला असता... आणि इतरांना त्याला तो द्यायचा नव्हता.... जीव तोडुन तो उडत होता..... हुलकावण्या देत होता कारण तो पदार्थ त्याचा जीव की प्राण होता.....

आता त्या पक्ष्याच्या मनातील ताण वाढत चालला होता.... धडधड वाढली.. त्या पदार्थामुळे त्याचा आनंद हळु हळु कमी होत चालला होता..... पण पाठीमागे लागलेले पक्षी त्याचा पिच्छा सोडत नव्हते.... आणि एका क्षणी त्याने निर्णय घेतला की जाउ दे ना..... एवढाच काय जीव अडकवायचा त्या पदार्थात द्या टाकुन..... असा विचार करत त्याने तो पदार्थ चोचीतुन सोडुन दिला.....

आणि सारे पक्षी आता त्या पदार्थाकडे वळले..... या पक्ष्याचा पाठलाग सोडुन दिला..... हा पक्षी पुन्हा मुक्तपणे व निर्भयतेने आकाशात विहार करु लागला..... अन्य मधुर फळांचा आस्वाद घेउ लागला....

आता त्याला एक सत्य गवसले.... की जरी आपल्याला तो पदार्थ मिळाला नाही.... तरी आपण आता स्वतंत्र आहोत..... अधिक आनंदी आहोत..... बाकीचे मात्र त्या पदार्थासाठी मारामारीच करत आहेत.... आणि गगनातील विहार करायचे विसरले आहेत...... आता ते बंधनात आहेत आपण मात्र मुक्त व आनंदी आहोत.......

यावरून आपण हाच बोध घ्यायचा.... आपल्या ह्या जीवनयात्रेत एकेक पाऊल पुढे टाकावयाचे आहे..... मग जे पदरात पडेल ते स्वीकारायचे..... जे निसटेल ते सोडायचे आणि पुन्हा पाऊल पुढे टाकत राहून मुक्कामाचे स्थान गाठावयाचे आहे.....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Sunday 22 April 2012

वसुंधरा दिन.... वनरक्षण, वनसंवर्धन व वनवर्धन... वसुधेचे ऋण फेडू चला... निसर्ग वाढवू चला....

आज आपल्‍या समोर नि‍रनिराळया समस्‍या उभ्‍या आहेत.... जसे नाहक होत असलेली वृक्षतोड, वाढती लोकसंख्‍या, कारखान्‍यांनी व वाहनांनी सोडलेला काळा धूर, दूषित सांडपाणी, घनकचरा, वाढत चाललेले वाळवंट.... याच बरोबर प्रदूषणामुळे जागतिक स्‍तरावर होत असलेले विशेष महत्‍वाचे परिणाम म्‍हणजे... वातावरणात होत असलेला बदल व ओझोनचा विरळ होत असलेला थर.... कदाचित आपल्‍या काही प्रयत्‍नांनी आपण या काही समस्‍या सोडवू शकतो.... परंतु नामशेष होत चाललेल्‍या वनस्‍पती आणि प्राणी यांचा -हास आपण भरुन काढू शकत नाही..... त्‍यामुळे या प्रश्‍नांवर आपण गंभीर पणे विचार करायलाच हवा.....

वैश्विक उष्मा, प्रदूषण, अन्न समस्या, ताणतणाव, पर्यावरणाचा ऱ्हास, संसाधनांची कमतरता, जलसंकट हे प्रगत मानवाला भेडसावणारे काही गंभीर प्रश्न..... यातील बहुतेक प्रश्नांचे उत्तर ‘वनांत’ आहे.... पृथ्वीवरील सजीवांच्या संदर्भात नैसर्गिक वनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.....

जंगले क्षितिजापर्यंत धूसर होत आहेत..... वनविनाशामुळे माणसासोबतच वन्यजीवांचेही अस्तित्व धोक्यात आहे...... विशेष म्हणजे पृथ्वीवरील एकूण जीवसृष्टीच्या अर्धी जीवसृष्टी ही वनाच्या आश्रयाने राहते..... पण त्यांचा जगण्याचा निसर्गदत्त अधिकार हिरावून घेतला जात आहे.... वृक्षारोपण म्हणजे जंगले नव्हेत..... पृथ्वीवरील सजीवांच्या संदर्भात नैसर्गिक वनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे..... वनांच्या र्‍हासामुळे दरवर्षी सुमारे १२00 कोटी टनापेक्षाही अधिक बहुमोल माती वाहून जाते.... या मातीपासून सुमारे पाच कोटी टन धान्य सहज पिकविता येऊ शकते..... साधारण सहा से.मी. मातीचा थर तयार होण्यासाठी दोन ते अडीच हजार वर्षे लागतात.....

मानवाच्या कोणत्याही गरजेची पूर्तता करण्यासाठी पहिला घाव पडतो तो वनांवरच..... वन साफ करूनच आपण नवीन जमीन मिळवतो..... मग ती जमीन शेतीसाठी असो,घरबांधणीसाठी असो, नागरी सुविधांच्या नावाखाली रस्ते, रेल्वेमार्ग, उद्योग बांधण्यासाठी असो, प्रचंड धरणे,वीजप्रकल्प, चराऊ कुरणे किंवा जनावरांसाठी खाद्यान्न लागवडीसाठी असो, पहिला घाव बसतो झाडांवरच.... अगदी परखड शब्दांत सांगायचे तर वृक्ष-वनांना मानवाचा काहीएक उपयोग नाही..... नाहीतर ती माणसाच्या आगमनापूर्वी जगली- फोफावली नसती..... वनांचे स्वाभाविक शत्रू म्हणजे नैसर्गिक आपत्ती,भयंकर पूर, वादळे , वणवे आणि रोग.... आज मात्र माणूसच त्यांचा सर्वात मोठा शत्रू ठरला आहे.....

प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि तिच्या गरजा (जीवनावश्यक आणि त्याहून जास्त उपभोग्यलोलूप) वनांच्या नाशाचे मूळ कारण आहे.... त्यातही आपण वृक्ष समूळ नष्ट करतो.... म्हणजे आपल्याच हाताने सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मारून टाकतो.... आज तिजोरी भरेल, पण उद्याचे काय..? वनांचे शाश्वत व्यवस्थापन व वनवर्धन हाच यावरचा उपाय आहे..... मूळ मुद्दलाला धक्का न लावता व्याजात गरजा भागवायच्या.... आणि त्याचबरोबर मुद्दल कसे वाढेल हे पाहणे म्हणजे वनांचे शाश्वत व्यवस्थापन होय..... हीच काळाची गरज आहे..... शाश्वत व्यवस्थापनाचा मंत्र आपल्याला विदुरनीतीत मिळतो..... ‘पुष्पं, पुष्पं विचिन्वीत, मूळच्छेदं न कारयेत।’ अर्थात फूल अन् फूल वेचा मात्र झाडाला धक्काही लावू नका..... हा निसर्गरक्षणाचा प्राचीन संदेश तर आपल्याच मातीतला आहे.....

गेल्या शतकात मानवाच्या राहणीमानात न भूतो न भविष्यती बदल घडून आला आहे.... निसर्ग हा न संपणाऱ्या स्रोतांचा खजिना आहे.... या विचाराने माणसाने त्याचा बेलगाम वापर सुरू केला.... हा वापर इतका जास्त झाला की, आता हिरवी आणीबाणी घोषित करण्याची वेळ आली आहे.... निसर्गाचा मुक्त वापर करत माणसाने आपले राहणीमानच बदलून टाकले आहे..... भरपूर वापरा, वापरा आणि फेका संस्कृती उदयाला आली..... नेटका वापर, काटकसर, पुनर्वापर हे शब्द जणू व्यवहारातून बादच झाले..... वापरा व फेका - यूज अँड थ्रो.... प्लास्टिकच्या वस्तू उदंड झाल्या.....

वनरक्षण, वनसंवर्धन व वनवर्धन यांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे..... सजीव सृष्टी जगायची असेल तर पर्यावरणही नीटपणाने राखले पाहिजे..... वनांबाबत उदासीन राहणे आपल्या विनाशावर शिक्कामोर्तब करण्यासारखेच आहे....वनांचे रक्षण आणि वर्धन करायला हवे.... अन्यथा पृथ्वीचा विनाश अटळ आहे..... निसर्गाचे रक्षक बना.... भक्षक नाही... धरित्री वाचली... तर जग वाचेल.....

आपल्यापैकी कितीतरी जण आयुष्यात एकही झाड लावत- जोपासत नाही..... निदान वाचविण्यासाठी तरी हातभार लावू शकतो..... वृक्षजोपासनेचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा..... आपल्याला झेपेल अशा पर्यावरण निगडित संस्थेशी संलग्न व्हा..... खारीचा वाटा उचला...... आजच्या वसुंधरा दिनी 'हिरवाई निर्माण' करण्याचा संकल्प सोडून सर्वजण त्यादृष्टीने कार्यरत झाले.... आणि रोजचाच दिवस हिरवा होऊ लागला तर आजच्या दिनाचे सार्थक झाले असे म्हणता येईल.....

मातीन अंग चोरलं आहे.... आकाशान मिटले डोळे .... अरे मानवा जागा हो तू .... धरणीला जड झाले ओझे......

ॐ श्री गुरुदेव दत्त ......

Thursday 19 April 2012



देशाभिमान जागृत करा .... समर्पण वृत्ती ठेवा .....

आयष्य फार थोड्या काळासाठी आहे.... अन जोपर्यंत आपण इथे आहोत..... तोपर्यंत आपण न घाबरता काही सत्कृत्य केले पाहिजे..... आपला महाराष्ट्र हा शूर लढवैयासाठी प्रसिद्ध आहेच ....

सर्वात प्रथम म्हणजे आपण स्वत:ला सामर्थ्यशील बनवायला हवे आणि आपले मन आणि अंत:करण शुद्ध ठेवायला हवे.... . दैवभक्ती, देशभक्ती आणि गुरुभक्ती या तीन गोष्टी वेगळ्या नाहीत..... त्या एकच आहेत..... हे ओळखायला पाहिजे.....

देशाबद्दल अभिमान किंवा समर्पण आपल्या वैश्विकतेबदल अडथळा बनूच शकत नाही..... आपला देशाभिमान वैश्विक चेतनेच्या आड येऊ शकत नाही..... स्वामी विवेकानंदानी देशभक्ती ठेऊन आपण वैश्विक कसे होऊ शकता याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.....

दैवभक्ती, देशभक्ती आणि गुरुभक्ती या तीन गोष्टी वेगळ्या नाहीत...... त्या एकच आहेत..... दैवत्वातून या जगाची उत्पत्ती झाली..... आणि हे विश्व म्हणजेच देव..... देव आणि निसर्ग या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत..... आपल्या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे नद्या, पर्वत, झाडे, गाई, वासरू, कुत्रा हे सगळे देवाचाच अविष्कार आहेत असे मानले जाते......

'या प्रकृती लीनास्या या परस्य महेश्वरा' ..... जो या निसर्गाशी एकरूप आहे तो महेश्वर, देव आहे..... आपल्याला निसर्गाबद्दल अनुकंपा असली पाहिजे.....

देशभक्ती आणि देवभक्ती वेगळी नाही..... जागरुकपणे आणि तळमळीने आपण देशाला पुढे नेऊ या..... स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील गौरवशाली भारत बनवण्यासाठी आपण संकल्प करू या.... असा भारत जो संपूर्ण जगाचे अध्यात्मिक नेतृत्व करेल......

आपणा सर्वांची ही जबाबदारी आहे..... आपल्या पैकी बरेच वयाने तरुण आहेत आणि बरेच मनाने.... आपण सगळ्यांनीच आज हा संकल्प करुया...... 

स्वामी विवेकानंदानी आपल्याला दिलेल्या सुंदर, संपन्न आणि सुयोग्य भारताच्या स्वप्नाची स्वतःला आठवण करून द्या.... ते स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करुया.... सदाचार आणि प्रामाणीकपणाची एक अशी लाट येऊ दे.... जी संपूर्ण देशभर पसरेल.....

जागरुकपणे आणि तळमळीने आपण देशाला पुढे नेऊ या....  स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील गौरवशाली भारत बनवण्यासाठी आपण प्रयत्न करुया....

 ॐ श्री गुरुदेव दत्त ......

Tuesday 17 April 2012


माझ्या जीवनातील ध्येय काय आहे ……. ध्येय कसे गाठावे ..... 

आज आपण जीवनात ध्येय काय व कसे गाठावे हे पाहूया..... सर्वात अगोदर आपल्याला नक्की काय करायचे आहे ते ठरवावे.... सर्व बाजूनी दूरदृष्टीने विचार करावा व नंतर प्रामाणिकपणे खालील चार प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील……

१] माझ्या जीवनातील ध्येय काय आहे ?
२] मी माझ्या स्वत:च्या धेय्यावर संशय तर घेत नाही ना ?
३] मी माझे ध्येय गाठण्यासाठी काम करताना आनंदी राहतो ना ?
४] सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते ध्येय साध्य करण्यातच आपले हित आहे .... हे आपल्याला निश्चित माहिती आहे का ?

ह्या चार प्रश्नांची उत्तरे ही आपल्याला स्वत:ला धोका न देता शोधायची आहे……

आणी जर आपण ह्या प्रश्नांची उत्तरे स्वत:ला धोका न देता शोधली तर आपल्याला आपले ध्येय गाठण्यापासुन कोणीच वंचीत करु शकणार नाही……

आता बघुया कि कसे आपण आपले ध्येय गाठु शकतो ?

सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घेणे जरुरी आहे…. ती म्हणजे कि आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट मेहनत घ्यावीच लागणार आहे……. आपले ध्येय सहजासहजी आपल्याला साध्य होणार नाही….. हि गोष्ट लक्षात ठेवणे जरुरी आहे.... तशी जर आपली शारीरिक - मानसिक तयारी असेल तरच आपण आपले लक्ष्य गाठु शकता……

पाच असे नियम जे आपल्याला ध्येय गाठण्यास फ़ायदेशीर राहतील…….

१] सर्वात महत्वाची गोष्ट ही कि आपले ध्येय हे अश्या ठिकाणी लिहुन ठेवावे कि आपले लक्ष येता-जाता त्यावर पडेल……. असे लिहिण्यास कारण असे कि आपण त्यामुळे नेहमी हे लक्षात घेवु कि हे आपले गाठायचे ध्येय आहे…….

२] ते ध्येय गाठण्यासाठी आपण काय करु शकता ह्या गोष्टींची यादी बनवणे…… जसे कि, जर आपल्याला काही व्यवसाय करायचा असेल तर त्या साठी आपण काय करु शकता ह्या कामांची लिस्ट बनवणे……..

३] परफ़ेक्ट वेळेचे सुत्र …… परफ़ेक्ट वेळेचे एकच सुत्र आहे ते म्हणजे आपले ध्येय + परफ़ेक्ट वेळ = आत्ताची वेळ ……

४] आपले ध्येय हे स्पष्ट हवे….. स्पष्ट चा अर्थ असा कि आपल्याला त्या सर्व गोष्टींची माहीती हवी जे ध्येय प्राप्त करताना गरजेच्य आहे…… जर ह्या गोष्टी स्पष्ट असल्या तर आपल्याला ध्येय गाठताना असलेल्या अडचणींना सामोरे जातांना त्रास होणार नाही……

५] वेळेचे नियोजन ……. आपल्याला हे लक्षात घेतले पाहीजे कि आपल्याला ध्येय किती दिवसात गाठायचे आहे……. जसे कि १ महीना, ६ महीने, १ वर्ष …... वेळेचे नियोजन हे एकाच गोष्टीसाठी करणे जरुरी आहे…… कारण जर आपण आपले ध्येय गाठण्याची वेळ नाही ठरवली…… तर आपण ते ध्येय गाठण्यास कधीही सिरियसली प्रयत्न करणार नाही……

चला तर आपणही आपले चांगले ध्येय निश्चित करू या ..... उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.... एखादे ध्येय निश्चित केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल.... तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो..... 

तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो.... परंतु असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते.....योग्य तेच ध्येया निवडा.... एकदा ध्येय ठरले की, कार्य करण्याची दिशा आपोआप गवसून जाईल......

आपल्या ध्येया सोबतच भारताला बलशाली करण्याच्या कार्यात आपला सिंहाचा वाटा उचलणे हेहि आपल्यासमोरचे सर्वोच्च ध्येय असले पाहिजे.... म्हणूनच तरुणांनी क्षणिक सुखाच्या मागे न लागता जीवनाचे ध्येय ठरवून स्वत:ला व देशाला तारले पाहिजे.... समाजाशिवाय माणसाला अस्तित्व प्राप्त होऊ शकत नाही.... म्हणून मीपणा सोडून समाजहिताचा विचार केला पाहिजे...... तरुण म्हणजे तारणारे... त्यांच्या बळावरच देश बलशाली ठरणार आहे..... दरवेळी पुढच्या नवीन पिढीवरच समाजाचे - देशाचे भवितव्य असते..... आपले कर्तव्य वेळीच जाणा.... भारताला बलशाली करा.....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Wednesday 11 April 2012

"मी"
मालवणी भाषेत एक म्हण आहे... "आप मेला, जग बुडाला" - आपण मेलो की सगळं संपलं... आपण मेलो की कुठल्याच भौतिक, भावनिक गोष्टीचा आपल्यावर परिणाम होत नाही...
यावर थोडे चिंतन केले तर असं लक्षात येतं की या "आप"ल्यातच काहीतरी गौडबंगाल दडलेलं आहे की जे संपूर्ण जगाचं कारण बनून राहिलंय... हे गौडबंगाल म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून माणसाचं "मन" आहे... कारण कोणत्याही कर्माची वासना ही पहिली मनात उत्पन्न होते तेव्हाच ती प्रत्यक्ष कृतीत उतरते...
विश्वनिर्मितीची वासना ही परमात्म्याच्या मनातच उत्पन्न झाली आहे... पण असं असूनही परमात्म्याचं मन हे त्याच्या इच्छेने चालत... त्याला वाटेल तेव्हा तो स्वतःच्या मनाची उत्पत्ती, स्थिती व लय घडवून आणू शकतो... कारण, तो ब्रह्मस्थितीत आहे...
मनात निरनिराळे विचार, वासना निर्माण होणं ही देखील परमेश्वराची "भन्नाट" योजना आहे...
पापपुण्याची वासना | तूच उपजविशी नारायणा |
आपुला रक्षिण्या मोठेपणा | पापी तूच निर्मिशी ||

या सगळ्यावर एकच पर्याय म्हणजे भगवद्गीतेवरील चित्र कायम मनात साठवून ठेवणे... त्या चित्रात अर्जुनाच्या रथाचे लगाम त्याच्या गुरूने म्हणजेच श्रीकृष्णाने आपल्या हातात ठेवले आहेत... तसेच प्रत्य्रेक जीवाचे, नव्हे चराचर सृष्टीचे लगाम केवळ भगवंतरुपी गुरुच्या हाती आहेत... हे एकदा समजले, की "मी" कुणीतरी आहे, सुख, दु:ख "मला" झाले हा भाव मरून जातो... हीच मोक्ष अवस्था आहे... 
ॐ श्री गुरुदेव दत्त... 


जीव वाचविणे हा माझा धर्म आहे...... बोधकथा.........

एकदा एक ऋषी नदीवर स्नानास गेले होते...... स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पाणी घ्यायला ते खाली वाकले तर त्यांना एक विंचू पाण्यात पडलेला दिसला...... तो विंचू पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता...... परंतु ते काही त्याला जमत नव्हते.......

ऋषींना त्याची दया आली..... त्यांनी त्या विंचवाला ओंजळीत उचलून घेतले व ते काठावर येण्यासाठी वळले तोच त्या विंचवाने जिवाच्या भीतीने त्यांच्या हाताचा चावा घेतला........ प्रतिक्षिप्त क्रियेने त्यांचा हातातून विंचू परत पाण्यात पडला...... ऋषींनी परत त्या विंचवाला उचलेले व परत काठावर येऊ लागले....... परत त्या विंचवाने हाताचा चावा घेतला. असे ३-४ वेळा तरी झाले...... एव्हाना ऋषींचा हात रक्तबंबाळ झाला होता......

हा सर्व प्रकार एक पांथस्थ बघत होता...... त्याला आश्चर्य वाटले...... विंचवाने एव्हढे चावे घेतले तरी ऋषी परत परत असे का करत आहेत ते त्याला कळेना....... त्याने त्या ऋषींना विचारले, "गुरुदेव, त्या विंचवाने आपला हात एव्हढा रक्तबंबाळ केला..... तरी आपण त्याला वाचवायचा एव्हढा अट्टहास का करत आहात?"..... ऋषी उत्तरले..... "चावा घेणे हा विंचवाचा धर्म आहे...... दुसर्‍याचा जीव वाचविणे हा माझा धर्म आहे...... जीव जात असताना पण तो त्याचा धर्म सोडत नाही..... तर मग मी का माझा धर्म सोडू....?

कथा – दुसरी.......

एकदा एक ऋषी नदीवर स्नानास गेले होते........ स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पाणी घ्यायला ते खाली वाकले तर त्यांना एक विंचू पाण्यात पडलेला दिसला........ तो विंचू पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता....... परंतु ते काही त्याला जमत नव्हते....... 

ऋषींना त्याची दया आली..... त्यांनी त्या विंचवाला ओंजळीत उचलून घेतले व ते काठावर येण्यासाठी वळले....... तोच त्या विंचवाने जिवाच्या भीतीने त्यांच्या हाताचा चावा घेतला....... प्रतिक्षिप्त क्रियेने त्यांचा हातातून विंचू परत पाण्यात पडला....... ऋषी नदीकाठी परत आले....... आपला कमंडलू उचलला....... परत पाण्यात गेले, विंचवाला कमंडलूत उचलले व जमिनीवर आणून सोडले.......

बोध:
दोन्ही गोष्टींमधे दोन्ही ऋषींनी आपला धर्म सोडला नाही....... परंतु पहिल्या ऋषींनी धर्म आंधळेपणाने आचरणात आणला....... धर्म असे कुठेच सांगत नाही....... कि दुसर्‍याचा जीव वाचवताना स्वतःला त्रास झालाच पाहीजे.......... हे दुसर्‍या ऋषीने जाणले होते व तेच आचरणात आणले........

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Corruption In India…. Reasons and Solutions ?

Corruption….

From clerks to the high profile politicians, police inspectors,  commissioners,  traffic police, stock exchange brokers, military establishments, recruiters, sportsmen, judiciary and most of the government employees, corruption is seen and felt in every transaction from bottom of the chain till the top…..
In the recent times the private Indian companies captured the top spot in encouraging corruption…..  when dealing with international clients in order to grab lucrative contracts…..

Why are the corrupt susceptible to corruption ….  ?

The low salaries of people made them susceptible….  bringing with it more inefficiencies and the easy way of making money with less or no accountability…..  The crime of corruption is easily forgotten……, the law offers easy way back into the mainstream and acceptance by the society……  In addition to that it is the lure of luxury…… personal status enhancement and the false sense of elitism that makes the corrupt vulnerable to illegal and unethical means of acquiring wealth….
The cultural connection and other reasons…….

Indian society still has a cultural setup of having the "man of the house" to work for a living…..  while the wife usually deals with the household work…. and this puts a pressure on the man to make the living more luxurious…..  The routine jobs are usually for life-long….. with the support of a union there is a lesser fear of losing the job and there is the pressure of dealing with rising prices of commodities…..  and sponsoring future education of children…..  The society….. the social upbringing….  the culture and a general greed also plays a critical role in influencing a timid mind…..  The lack of instincts and to avoid the time consuming bureaucratical setup of the organization….. the corruption may be a easy way out for people who bribe to make things happen……

How can we stop corruption…. What is solution… ?

Greater solutions may include population control…..  to improve the quality than the quantity…… Controlling population will bring up the quality of life…..  and thus lesser competition and effective control of people…..  and government processes…..  However feasible solutions are to impart moral principles in schools….  and introduction of stringent audits…. Accountability…. effective tracking of corrupt individuals through citizen cards or tax id's…..

Computerization of processes…. privatization of public sectors…. eliminating the chain of corruption by not just punishing the first level…..  but also higher levels involved……

Corruption is not limited to atheists…. even the most corrupts are highly religious and have close family ties….. in other words corruption has no boundaries…… Religion and religious congregations can support and promote anti-corruption drives….

Corruption is NOT a luxury tax….. Whoever described corruption is a luxury tax probably said it out of frustration….. the religion of corruption…. the corruption of politics….the dishonest souls and perversion of integrity is unpardonable…..

Make yourself clean and don't get indulged in any corruption……. neither give any opportunity to others from your side….. to get into corruption and a day will come when everyone will think like this and there will be no corruption……

Most important thing is don't wait for others to be honest…. start from yourself….

For a BETTER FUTURE  Save India....Stop Corruption!

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

Friday 6 April 2012


स्पर्धा…. मी लवकर कसा यशस्वी होईन…….
आज आपण पाहतो सर्वत्र स्पर्धा आहे..... स्पर्धा तर जबरदस्त आहे..... अशा स्पर्धात्मक वातावरणात आजच्या तरुणाला करिअर घडवायचे आहे.... प्रत्येकजण घाईत आहे....  मी लवकर कसा यशस्वी होईन यात..... परंतु या गडबडीत आपण काही बेसिक नियम विसरू नयेत......

सकारात्मक विचार ...... एखादयाच मुख्य ध्येयावर आपली दृष्टी ठेवा...... कोणतेही काम करताना त्याचा सकारात्मक विचार करावा...... नकारात्मक विचारांचा आपल्या उत्साहावर व कृतीवर परिणाम होतो....... कुठलेही काम हलके समजू नये...... जगातले प्रत्येक काम हे श्रेष्ठच असते...... पण जो मनुष्य अंग मोडुन आपले कर्तव्य चोखपणे बजावतो.... तो यशस्वी होतो आणि त्याला अधिकाधिक कार्य करण्याची संधी मिळते.....

वेळेचे नियोजन…… वेळेची किंमत जाणणे हा सर्वात मोठा शहाणपणा आहे.......कोणत्याही यशस्वी माणसाचा नीट अभ्यास करा..... त्यातून आपण बरेच काही शिकू शकाल..... इतर माणसाइतकाच वेळ यशस्वी माणसाकडेही असतो..... पण तो त्या वेळेचे व्यवस्थित मॅनेजमेंट करुन अधिकाधिक वापर करतो...... आजचे काम आजच पुर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करा........ चालढकल, फाटे फोडणे यांतून काहीच साध्य होत नाही..... हे लक्षात ठेवावे........

नियोजन……. नियोजनामुळे कामाला बंदिस्तपणा येतो..... तीच यशस्वी प्रोफेशनलची ओळख आहे...... अशी माणसे विचारपुर्वक योजना आखून आपली कामगिरी यशस्वी करीत असतात...... एखादया कामाला सुरुवात केल्यानंतर कितीही अडचणी आल्या तरी ते पूर्ण करा..... परंतू त्यासाठी शॉर्टकर्ट वापरु नका......

संवाद ...... आपले विचार, आपली मते इतरांपर्यत आपण कसे पोहोचवतो यावर आपले यश अवलंबून असते........ एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल, समजली नसेल तर ती दुसऱ्याकडून शिकुन घ्यायची सवय लावा..... त्यात कमीपणा मानू नका......

निर्णयक्षमता ………. सुसंधी कोणाची वाट पहात नसते...... आणि गेलेली वेळही परतून येत नसते...... यासाठी कोणताही निर्णय वेळीच पूर्ण करा......योग्य वेळी योग्य निर्णय घेणे यातून आपली पात्रता दिसत असते....... यामुळे आपल्या प्रगतीतील अडसर दूर होतील...... आपली निर्णय क्षमता आपल्या यशाचा कालावधी वाढवतो.....
श्रवण क्षमता ……… उतावळीपणा बऱ्याचदा घातक ठरतो..... आपल्या संपर्कातील लहान मोठया व्यक्तींचे मत, म्हणणे ऐकुन घेण्याची सवय लावा.......व्यावसायिकतेसाठी इतरांचे ऐकून घेणे आवश्यक आहे......महत्वाचा नियम म्हणजे इतरांचे ऐकून घेणे यातून आपल्याला महत्वाचे टर्निग पॉइंटही मिळू शकतात......

जोखीम …… थोड्याफार प्रमाणात जोखीम उचललीच पाहिजे…… धाडसाने जोखीम उचलणारा यशस्वी होतो.......साहसीपणा हा गुणही आपण जोपासायला हवा...... जो जेवढी रिस्क घेईल, त्याला तेवढे जास्त यश मिळेल..........जोखीम उचला परंतु होणाऱ्या परिणामापासून बेसावध राहू नका...... बेसावधपणामुळे आयुष्याचे खूप नुकसान होऊ शकते...... अशा वेळी परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा व निराश न होता जोमाने कामाला लागा........आपल्या विचारात सकारात्मक बदल करुन मार्गात येणा-या छोटया मोठया अडचणींवर मात करा........

दिवसभराच्या नोंदी ..... तुम्ही दिवसभरात जे काही चांगले पाहाल किंवा ऐकाल...... त्यांची नोद डायरीत करुन ठेवा...... त्याचा तुम्हाला भविष्यकाळात निश्चितच फायदा होईल.....

ॐ श्री गुरुदेव दत्त ..........
खरा जीवनबोध... 

" एक छान गोष्ट - पाहू आपल्यालाही जमतंय का आपल्या पाल्याला असंच वळण लावता येतं का ?".. हि सत्य घटना आहे आणि प्रथम एजुकेशन या संस्थेसाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीने शेअर केली आहे...

शाळेने पत्रक काढलं, ' यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा, ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला / विद्यार्थिनीला मिळेल..!..
आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे, खरोखर पंचाईतच होती... ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की, अगदी एक विजार, एक सदरा असेल, तरी तो रोज धुऊन - वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात..

यातून मग गरीब मुलगा शोधायचा कसा.?. आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब; तेही सर्वात गरीब म्हणून.?. मोठीच अडचण होती.. तीन-चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले.. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे; पण लहान मुलांमधे अडचणीचं.. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची.. मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची.. अशा मुलांना विचारलं, “मला एक मदत कराल का.?. आपल्या वर्गातला सर्वात गरीब.?." क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले, " सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं, तो सर्वात गरीब आहे .."

मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता.. "कशावरून म्हणता.?"... "सर, त्याचा सदरा दोन-तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय... त्याने शिवलाय; पण फ़ाटलेला शर्ट घालतो.. चपला त्याला नाहीतच... मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो... तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो.. सर, ती भाकरीही कालचीच असते... भाजी कुठली सर.?. गुळाचा खडा असतो.. आम्ही सांगतो, तो सर्वात गरीब आहे.. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी.." मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली... पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते.. मयूर एवढा गरीब असेल.?. की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत.?.

कारण, मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता.. अक्षर स्वच्छ, मोकळं होतं.. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे.. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं, " पाहिलंस.!. हे सातवीतल्या मुलाचे अक्षर.. असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते.. उत्तराल सुबक परीच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे.." चे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत यॆई... माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे... असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये, या गोष्टीचीच मला खंत वाटली...

जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो... अरेरे !.., मी खूप कमी पडतोय... मयूर, गेल्या सहलीला आला नव्हता... अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती; पण त्याचं नाव यादीत नव्हतं... आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही... .असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती... केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले... एका छान अनुभवाला मुकला होता तो... हा आनंद मी हिरावला होता... यादीत मयूरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही..?.. मयूर स्वत:हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता..!..

शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो... खरंच आहे, मुलांनी सुचवलेलं नाव... आर्थिक मदत, तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी... आता शंकाच नव्हती.... त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते... मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन टाकले.... 'मयूर जाधव, सातवी अ, अनुक्रमांक बेचाळीस' डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, "खात्री केलीये ना सर.?. कारण थोडीथोडकी रक्कम नाही...

या विद्यार्थ्याची वर्षाची फ़ी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, गणवेश... इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे..".. मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं, "सर, त्याची काळजीच करू नका... वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर - मयूर जाधवच आहे.!.".. एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो.... मयूरला मिळणारी मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही...

दुसऱ्या दिवशी शाळेत लवकरच गेलो... देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता... त्यावर 'गरीब असूनही आदर्श' असं म्हणून मयूरचं नाव होतं.... शाळा भरली... मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो... इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला... त्याच्या चेहऱ्यावरचा भाव समजत नव्हता... द्विधा भाव आवरावा तसा करारी चेहरा... "सर, रागवू नका; पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका.."..

"अरे, काय बोलतोयस तुला समजतय का ?."..

"चुकतही असेन मी... वाट्टेल ती शिक्षा करा ; पण ते नाव...!!"..

त्याच्या घशातला आवंढा, डोळ्यातलं पाणी... मला कशाचाच काही अर्थ लागेना... मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत, तो असा.?". सर, मला मदत कशासाठी.?. गरीब म्हणून.?. मी तर श्रीमंत आहे.".

त्याची रफ़ू केलेली काँलर माझ्या नजरेतून सुटत नव्हती... येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते... शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती... "अरे पण.?".

" सर, विश्वास ठेवा... मी श्रीमंत आहे... कदाचित सर्वात श्रीमंत असेन... सर, मी गरीब आहे हे ठरवले कोणी..?. मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला; पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज..".

अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले... त्याला उठवत मी म्हणालो, " ठीक आहे... तुला नकोय ना ती मदत, नको घेऊस; पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय. ?".

" सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा, कुठल्याही विषयाच्या.. त्या पूर्ण आहेत... पुस्तकं मी Second Hand वापरतोय... खरयं ! पण मजकूर तर तोच असतो ना.?. मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का.?. सर, माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या तीनात असतो... गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत...

सर... सर, सांगा ना, मी गरीब कसा. ?". मयूर मलाच विचारत होता..

आता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं...

"खरयं मयूर . पण तुला या पैशाने मदतच..".

" सर, मदत कसली.?. माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल... शाळाच फ़ी देतीये म्हटल्यावर, मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन.! ".

" म्हणजे ?".. वडील घरांना रंग द्यायचे काम करतात...

हो सर... Contractor बोलावतो तेव्हाच काम मिळते... तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात... चार पैसे मला मिळतात, ते मी साठवतो... सर, संचयिका आहे ना शाळेची, त्यातलं माझं पासबुक बघा... पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात... मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते... म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं... पण सर, मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे... घरातले सगळे काम करतात... काम म्हणज कष्ट... रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात... आई धुणं - भांडी करते... मोठी बहीण दुसरी - तिसरीच्या शिकवण्या घेते...

सर, वेळ कसा जातो, दिवस कसा संपतो ते कळतच नाही... शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत... तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी... सर, माझ्या घरी याच तुम्ही, माझ्याकडे पु . ल . देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे... सर, आहे ना मी श्रीमंत.. ?"..

आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता... सर, शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो... रात्री देवळात भजनात मीच पेटीची साथ देतो...

त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता... अभावितपणे मी विचारलं, " व्यायामशाळेतही जातोस.?".. सर, तेवढी फ़ुरसत कुठली.?. घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो..".

अंगावर एक थरार उमटला... कौतुकाचा... " मयूर मित्रा, मला तुझा अभिमान वाटतो... तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा .."..

म्हणूनच म्हणतो सर .!".

"हे नाव ज्या कारणासाठी आहे, त्यात तू नक्कीच बसणार नाहीस... आमची निवड चुकली; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल... शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून, हे पारितोषीक तरी.."..

" सर, एवढ्यात नाही.. त्याला वर्ष जाउ द्या.. मी लिंकनचं, सावरकरांचं चरित्र वाचलं, हेलन केलरचं चरित्र वाचलं... सर, हे वाचलं नि कळल की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली... माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या, योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा; पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल... जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल...

सर ..... प्लीज .....!"

वाचनानं, स्पर्धांतल्या सहभागानं, कलेच्या स्पर्शानं, कष्टानं... त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती, संस्कारामुळे नम्रतेची झालर होती... आता मला माझ्या समोरचा मयूर जाधव स्पष्ट दिसतही नव्हता... त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते... शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता... परिस्थिती पचवून, परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा..!. श्रीमंत.!. सर्वात श्रीमंत... 

ॐ श्री गुरुदेव दत्त ......



अपयशाचा उपयोग यश प्राप्तीकरता होऊ शकतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.....

आज आपण पाहतो .... प्रत्येक ठिकाणी स्पर्धा...... अशा या स्पर्धेच्या युगात तणावाला तोंड देताना मानसिक संतुलन राखणं..... म्हणजे आणखी एक तणावच असतो..... अशावेळी मानसिक संतुलन बिघडू शकते ..... म्हणूनच आज मानसिक रूग्णांचं प्रमाण फार वाढलेलं आहे....

स्पधेमुळे आपण सर्वजण जीवनात वेगवेगळे मुखवटे घालून वावरत असतो..... जास्त मेकअप लावल्यास त्याला जसे तडे पडतात, तसेच तडे आपल्या व्यक्तिमत्त्वाला पडतात.... आपण हुशार नसताना.... खूप हुशार आहोत असा आव आणला की आपल्या मनावर ताण पडतो..... आपल्या व्यक्तिमत्त्वातील सहजता नाहीशी होऊन आपले मानसिक संतुलन धोक्यात येते....

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या क्षमता व मर्यादा यांची जाणीव ठेवायला हवी...... क्षमता आणि आकांक्षा यात खूप अंतर असल्यास व्यक्तीला अपेक्षाभंग... निराशा व मानसिक संघर्ष इत्यादी नकारात्मक भावनांना तोंड द्यावे लागते......

त्यामुळे व्यक्तीला परिस्थितीनुसार स्वत:च्या ध्येय किंवा आकांक्षेची पातळी कमी जास्त करता यायला हवी..... दुराग्रहीवृत्ती व अट्टाहास मानवी जीवनात केवळ दु:ख व निराशा निर्माण करत नाही.... तर मानसिक संतुलनात अडथळे निर्माण करून पुढील जीवनात मानसिक आजारी बनवतात.....

जीवनात घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबरच हवा असा आग्रह करू नये..... कालांतराने यापैकी काही निर्णय चुकल्याची जाणीव होते..... पण आपल्या हाती आता करण्यासारखे काहीचे नसते...... अशावेळी त्याबद्दल खंत न करता केवळ आपला निर्णय योग्य नव्हता.... ही जाणीव ठेवल्यास आपण स्वत:ला किंवा इतरांना दोष देण्याची चूक करणार नाही व त्यामुळे आपले मानसिक संतुलन ढळणार नाही..... लक्षात ठेवा ..... जीवनातील कोणत्याही कार्यात अपयश हा अपरिहार्य भाग आहे.....

आपणास सर्वच क्षेत्रात यशस्वी व्हायला आपल्याला आवडते..... यशाचे अत्युच्च टोक गाठल्यानंतर कोणतीही व्यक्ती त्या स्थानावर नेहमीकरता राहू शकत नाही..... जीवनात येणाऱ्या अपयशांमुळे प्रयत्न करणे सोडणे हे देखील बरोबर नाही..... अपयशाचा उपयोग यश प्राप्तीकरता होऊ शकतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.....

शेवटी काय तर .... आपली धडपड असते आपल्या आयुष्यातील सुखासाठी....आनंदात असण्यासाठी..... आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल.... असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो..... खरं असं, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही...... यश - अपयश येतच राहणार ..... आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच...... ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्चय करायचा हेच बरं नाही का..?

ॐ श्री गुरुदेव दत्त ......



यशही तुमचेच आहेअपयशही तुमचेच आहे ..... 

यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत...... यशानंतर अपयश येतं अथवा अपयशानंतर यश येतं हे तपासणं म्हणजेच तुमच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्व विकासाचा शोध घेणं होय....... यश आधी त्यानंतर अपयश प्राप्त होतं किंवा अपयश आधी त्यानंतर यश प्राप्त होतं हे सांगणं कठीण आहे....

तसंच या यशाची आणि अपयशाची सुरुवात आपल्याकडून होते.... यशही तुमचेच आहेअपयशही तुमचेच आहे......   कारण दोन्हीही यशअपयश तुमच्याकडूनच तुम्हाला मिळाले आहे,  हे नाकारून चालणार नाही....  यश कधी येते.... ? आणि अपयश कधी येते....? 

यश आले तर आपली मेहनतयोग्य नियोजनकष्ट याचा हमखास आपण विचार करतो आणि आपणच आपली पाठ थोपटतो...... अपयश आले कीदैवाच्या पुडीत त्याला बांधतो..... दैवाने साथ दिली नाहीहा विचार आपण  करतो......  यश-अपयशात ज्ञानपरिस्थितीअनुभव इच्छाशक्तीप्रयत्ननियोजनगुंतवणूकमेहनत , परिश्रमसंवाद,  अशा अनेक गोष्टींचा समावेश करता येतो...... जे ज्ञान आपल्याकडे आहे त्याचा वापर कसा करतो या अगदी मूलभूत गोष्टी आहेत आणि सरळसुद्धा आहेत...... 

या बाबतीत नेमके होते काय……. दुसऱ्याचे यश ऐकून पाहून आपण कुढत बसतो...... समजा दोघेही समव्यवसायी असल्यास एकमेकांकडून शिकण्यासारखे असते..... त्याचेही रेस्टॉरंट आहेआपलेही तेवढय़ाच तोलामोलाचे आहे......  मग तिथे खवय्यांची वर्दळ जास्त का आहे...?  याचा तपास करणं हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे....... समोरच्याचे प्रयत्नकष्ट आपण समजावून घेत नाही...... यशाचा मार्ग फार सोपा आहे,   असे जगातील जाणकार म्हणतात....... जे तुम्ही करता ते जीव ओतून करावे...... गुंतागुंतीचा व्यवहार  करता सोपा मार्ग निवडावा......

जगातली यशवंत माणसं कशी यशस्वी झाली...? याचा प्रथम शोध घ्या.....  त्यांच्यावरचे लिखाण वाचा...... त्यासाठी चिंतन फार महत्त्वाचे आहे......  इच्छाकृती आणि योग्य नियोजन करा म्हणजे माणूस अपयशी होत नाही....... एखादा माणूस यशाच्या शिखरावर पोहोचला म्हणजे कसा पोहोचलाकुठून आला..? त्याचे झिजणं.... त्याचे कष्ट  समजावून घ्या.... 

आता यांत्रिक युगात जगात सगळीकडे त्याचे करिअर होऊ पहात आहे......  जपानमध्ये एक म्हण आहे.......  त्याचा भावार्थ असा -  यशअपयश हे एकाच नदीचे किनारे आहेत...... श्रम  करता नदीत मासे पकडणे हा फार मोठा गुन्हा आहे.... असा गुन्हा कधी करू नये..... आणि असा गुन्हा (श्रम  करण्याचाकेलाच तर आयुष्यभर अपयशाच्या पायरीवर बसावे लागेल......

 श्री गुरुदेव दत्त ......