Thursday, 19 April 2012



देशाभिमान जागृत करा .... समर्पण वृत्ती ठेवा .....

आयष्य फार थोड्या काळासाठी आहे.... अन जोपर्यंत आपण इथे आहोत..... तोपर्यंत आपण न घाबरता काही सत्कृत्य केले पाहिजे..... आपला महाराष्ट्र हा शूर लढवैयासाठी प्रसिद्ध आहेच ....

सर्वात प्रथम म्हणजे आपण स्वत:ला सामर्थ्यशील बनवायला हवे आणि आपले मन आणि अंत:करण शुद्ध ठेवायला हवे.... . दैवभक्ती, देशभक्ती आणि गुरुभक्ती या तीन गोष्टी वेगळ्या नाहीत..... त्या एकच आहेत..... हे ओळखायला पाहिजे.....

देशाबद्दल अभिमान किंवा समर्पण आपल्या वैश्विकतेबदल अडथळा बनूच शकत नाही..... आपला देशाभिमान वैश्विक चेतनेच्या आड येऊ शकत नाही..... स्वामी विवेकानंदानी देशभक्ती ठेऊन आपण वैश्विक कसे होऊ शकता याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.....

दैवभक्ती, देशभक्ती आणि गुरुभक्ती या तीन गोष्टी वेगळ्या नाहीत...... त्या एकच आहेत..... दैवत्वातून या जगाची उत्पत्ती झाली..... आणि हे विश्व म्हणजेच देव..... देव आणि निसर्ग या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत..... आपल्या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे नद्या, पर्वत, झाडे, गाई, वासरू, कुत्रा हे सगळे देवाचाच अविष्कार आहेत असे मानले जाते......

'या प्रकृती लीनास्या या परस्य महेश्वरा' ..... जो या निसर्गाशी एकरूप आहे तो महेश्वर, देव आहे..... आपल्याला निसर्गाबद्दल अनुकंपा असली पाहिजे.....

देशभक्ती आणि देवभक्ती वेगळी नाही..... जागरुकपणे आणि तळमळीने आपण देशाला पुढे नेऊ या..... स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील गौरवशाली भारत बनवण्यासाठी आपण संकल्प करू या.... असा भारत जो संपूर्ण जगाचे अध्यात्मिक नेतृत्व करेल......

आपणा सर्वांची ही जबाबदारी आहे..... आपल्या पैकी बरेच वयाने तरुण आहेत आणि बरेच मनाने.... आपण सगळ्यांनीच आज हा संकल्प करुया...... 

स्वामी विवेकानंदानी आपल्याला दिलेल्या सुंदर, संपन्न आणि सुयोग्य भारताच्या स्वप्नाची स्वतःला आठवण करून द्या.... ते स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करुया.... सदाचार आणि प्रामाणीकपणाची एक अशी लाट येऊ दे.... जी संपूर्ण देशभर पसरेल.....

जागरुकपणे आणि तळमळीने आपण देशाला पुढे नेऊ या....  स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील गौरवशाली भारत बनवण्यासाठी आपण प्रयत्न करुया....

 ॐ श्री गुरुदेव दत्त ......

No comments:

Post a Comment