आयुष्याला आकार देण्याची साधना..........गुरुबोध.....
आपण रोजच्या जीवनात अनुभवतोच की Empty mind is Devil's workshop....... रिकामे मन हे.. सैतानाचे घर......असे आपण कितीही म्हणत असलो तरी हे रिकामपण घालवण्यासाठी आपण काय करतो....... आज आपल्यात अनेक जण असतील.... ज्यांची अजून गुरु भेट झालेली नाही / ज्याना गुरु नाही..... आता गुरु नाही...मी काय करावे हा प्रश्न पडतो......
प्रत्येकाने आपापल्या परीने साधना / नामस्मरण करीत राहावे.... संत साहित्य वाचावे....गुरुबोध किंवा इतर ठिकाणच्या पोस्ट वाचाव्या....त्यातील सार / conclusion काय ते जाणावे व आपल्या जीवनात implement करण्याचा प्रयत्न करावा.... एक ना एक दिवस आपली गुरु भेट नक्कीच होईल....
तो पर्यंत आपले दुर्गुण कमी कसे होतील त्यावर लक्ष केंद्रित करावे.....आपल्याला स्वतःमध्ये लगेच बदल घडवून आणणे शक्य नाही..... याकरता वेळ हा लागणारच … यासाठी वेळ फुकट न घालवता चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा..... आजकाल आपण as per time management वागतो... साधना करण्यासाठी time management करा..... आपला भरपूर स्ट्रेस कमी होईल व मन:शांती लाभेल.....
जो सर्व गुणी आहे तो संत.... ज्यात सर्व सदगुण १०० % आहेत तो संत... आपण काही संत नाही... तरीदेखील आपण सर्वगुणी कसे होऊ यासाठी प्रयत्न केला पाहिजे..... आज आपण गुरुबोध ...किंवा इतर ठिकाणी वाचतो..... त्यातील आपापल्या परीने १० - ४० % जरी अंगी बाणवू शकलो व तसे वागलो..... तरी भगवंत आपल्यापासून दूर नाही..... असे करत आपण ५० -६०- ८० %...... एक न एक दिवस आपण १००% आसपास पोचण्याचा प्रयत्न करूया .... भगवंत प्राप्तीसाठी (मोक्ष) आज प्रयत्न केले तर.... आपल्या प्रयत्नानुसार या जन्मी नाही तर.... पुढल्या जन्मी तरी मोक्ष प्राप्ती होईल असे ध्येय असावे....
यासाठी आजच प्रयत्न केले पाहिजेत...... अध्यात्म फक्त म्हातारपणी करावे... हे म्हणणे चुकीचे आहे...... तो पर्यंत फार उशीर होईल..... माऊलीनी अभंगात सांगितले आहेच...... मोलाचे आयुष्य दवडिसी वाया। माध्यान्हीची छाया, जाय वेगी।। ......
उदाहरण द्यायचे झाल्यास.....आपल्याला जर एका ठिकाणी जायचे आहे ....परंतु आपण काही न करता एका जागी बसून राहिलो...तर आपण इच्छित ठिकाणी पोचणे शक्य नाही...... यासाठी आपण पुढाकार घेऊन, मार्गक्रमणा केल्यशिवाय ते शक्य होत नाही..... व आपल्याला कोणत्याही प्रवासासाठी वेळ हा लागतोच....
तात्पर्य काय तर आपली गुरु भेट झालेली असो किंवा नसो..... आपले सर्वाचे भगवंत प्राप्ती हे आपले ध्येय / उद्धिष्ट / इच्छित ठिकाण आहे..... आणि या प्रवासासाठी वेळ लागणारच...... यात प्रत्येकाच्या साधनेनुसार कमी - अधिक वेळ लागेल.... हा प्रवास वेळ व्यर्थ न घालवता चालू करा...... सदगुरु भेट झाली कि सदगुरु योग्य मार्गदर्शन करतीलच........
भेटीशी कधी तू मला गुरुराया .....आतुर मी झालो तुला बघाया ......बहुत चुकलो तरी सांभाळा या पामरा.....नमस्कार माझा तुला गुरुराया......
श्री गुरुदेव दत्त........
No comments:
Post a Comment