Monday, 2 April 2012


आत्मबोधाचा सुखसंवाद........

मानवी जीवन आणि विश्वजीवनाचं मूळ अधिष्ठान अनंत कोटी ब्रह्मांडनायक असून, तो व्यवस्थारूप आहे........ मानवी जीवन हे एक महायुद्ध असून, या तीव्र जीवन कलहांत जो सावध राहून त्यांना सामोरा जातो तोच विजयी होतो........ 

यासाठी अखंड सावधानता हाच प्रत्येक साधकाचा स्थायिभाव असायला हवा..... साधकाने सावध असणे म्हणजे ......भगवंत हेच सर्वसुखाचे एकमेव साधन आहे हे एकदा स्वीकारले आणि त्याच्या प्राप्तीसाठी नामस्मरण करणे हे साधन नक्की केले की त्या मार्गात येणाऱ्या अडचणींबाबत साधकाने सावध असणे जरुरी आहे........

आजच्या विज्ञान युगात गीतेतील प्रत्येक विचार माणसाला अंतर्मुख करणारा असून, जीवनाला स्थैर्य देणारा आहे...... आज माणूस भौतिक विषयसुखाच्या नादी लागला आहे...... सुखाची वाट पाहत आहे....... आंतरिक आमूलाग्र क्रांतीच्या दिशेने उत्कर्ष आणि उन्नती कशी करावी, हे गीतेतून सांकेतिक पद्धतीने दिग्दर्शित केलेलं आहे......

शाळेतील गणितं सोडवताना हातचा एक धरायला मनुष्य विसरतो तेव्हा संबंध गणित चुकतं...... त्याचप्रमाणे आयुष्याचं गणित सोडवताना हातचा..... म्हणजे हृदयस्थ जो एक भगवंत असतो.... त्याला आपण विसरलो तर संपूर्ण आयुष्याचं गणितच चुकतं...... 

म्हणून हृदयस्थ आणि विश्वस्थ असा जो स्वसंवेद्य भगवंत त्याचं अखंड अनुसंधान करणं...... हेच आपलं जीवनध्येय आहे याची पदोपदी आठवण राहावी........

श्री गुरुदेव दत्त ...........

No comments:

Post a Comment