Tuesday 17 April 2012


माझ्या जीवनातील ध्येय काय आहे ……. ध्येय कसे गाठावे ..... 

आज आपण जीवनात ध्येय काय व कसे गाठावे हे पाहूया..... सर्वात अगोदर आपल्याला नक्की काय करायचे आहे ते ठरवावे.... सर्व बाजूनी दूरदृष्टीने विचार करावा व नंतर प्रामाणिकपणे खालील चार प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील……

१] माझ्या जीवनातील ध्येय काय आहे ?
२] मी माझ्या स्वत:च्या धेय्यावर संशय तर घेत नाही ना ?
३] मी माझे ध्येय गाठण्यासाठी काम करताना आनंदी राहतो ना ?
४] सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते ध्येय साध्य करण्यातच आपले हित आहे .... हे आपल्याला निश्चित माहिती आहे का ?

ह्या चार प्रश्नांची उत्तरे ही आपल्याला स्वत:ला धोका न देता शोधायची आहे……

आणी जर आपण ह्या प्रश्नांची उत्तरे स्वत:ला धोका न देता शोधली तर आपल्याला आपले ध्येय गाठण्यापासुन कोणीच वंचीत करु शकणार नाही……

आता बघुया कि कसे आपण आपले ध्येय गाठु शकतो ?

सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घेणे जरुरी आहे…. ती म्हणजे कि आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट मेहनत घ्यावीच लागणार आहे……. आपले ध्येय सहजासहजी आपल्याला साध्य होणार नाही….. हि गोष्ट लक्षात ठेवणे जरुरी आहे.... तशी जर आपली शारीरिक - मानसिक तयारी असेल तरच आपण आपले लक्ष्य गाठु शकता……

पाच असे नियम जे आपल्याला ध्येय गाठण्यास फ़ायदेशीर राहतील…….

१] सर्वात महत्वाची गोष्ट ही कि आपले ध्येय हे अश्या ठिकाणी लिहुन ठेवावे कि आपले लक्ष येता-जाता त्यावर पडेल……. असे लिहिण्यास कारण असे कि आपण त्यामुळे नेहमी हे लक्षात घेवु कि हे आपले गाठायचे ध्येय आहे…….

२] ते ध्येय गाठण्यासाठी आपण काय करु शकता ह्या गोष्टींची यादी बनवणे…… जसे कि, जर आपल्याला काही व्यवसाय करायचा असेल तर त्या साठी आपण काय करु शकता ह्या कामांची लिस्ट बनवणे……..

३] परफ़ेक्ट वेळेचे सुत्र …… परफ़ेक्ट वेळेचे एकच सुत्र आहे ते म्हणजे आपले ध्येय + परफ़ेक्ट वेळ = आत्ताची वेळ ……

४] आपले ध्येय हे स्पष्ट हवे….. स्पष्ट चा अर्थ असा कि आपल्याला त्या सर्व गोष्टींची माहीती हवी जे ध्येय प्राप्त करताना गरजेच्य आहे…… जर ह्या गोष्टी स्पष्ट असल्या तर आपल्याला ध्येय गाठताना असलेल्या अडचणींना सामोरे जातांना त्रास होणार नाही……

५] वेळेचे नियोजन ……. आपल्याला हे लक्षात घेतले पाहीजे कि आपल्याला ध्येय किती दिवसात गाठायचे आहे……. जसे कि १ महीना, ६ महीने, १ वर्ष …... वेळेचे नियोजन हे एकाच गोष्टीसाठी करणे जरुरी आहे…… कारण जर आपण आपले ध्येय गाठण्याची वेळ नाही ठरवली…… तर आपण ते ध्येय गाठण्यास कधीही सिरियसली प्रयत्न करणार नाही……

चला तर आपणही आपले चांगले ध्येय निश्चित करू या ..... उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.... एखादे ध्येय निश्चित केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल.... तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो..... 

तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो.... परंतु असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते.....योग्य तेच ध्येया निवडा.... एकदा ध्येय ठरले की, कार्य करण्याची दिशा आपोआप गवसून जाईल......

आपल्या ध्येया सोबतच भारताला बलशाली करण्याच्या कार्यात आपला सिंहाचा वाटा उचलणे हेहि आपल्यासमोरचे सर्वोच्च ध्येय असले पाहिजे.... म्हणूनच तरुणांनी क्षणिक सुखाच्या मागे न लागता जीवनाचे ध्येय ठरवून स्वत:ला व देशाला तारले पाहिजे.... समाजाशिवाय माणसाला अस्तित्व प्राप्त होऊ शकत नाही.... म्हणून मीपणा सोडून समाजहिताचा विचार केला पाहिजे...... तरुण म्हणजे तारणारे... त्यांच्या बळावरच देश बलशाली ठरणार आहे..... दरवेळी पुढच्या नवीन पिढीवरच समाजाचे - देशाचे भवितव्य असते..... आपले कर्तव्य वेळीच जाणा.... भारताला बलशाली करा.....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

3 comments:

  1. जगाला शांतीचा आणि शाश्‍वत मार्ग दाखवायचा असेल.... तर भारताने बलशाली झालेच पाहिजे..... त्याला पर्याय नाही..... भारताला बलशाली करण्याच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलणे हे आपल्यासमोरचे सर्वोच्च ध्येय असू शकते..... ॐ श्री गुरुदेव दत्त ......

    ReplyDelete
  2. जसे management / corporate world , ध्येय वा Goal setting वर चालते ......आपल्याला थोड्याफार फरकाने व्यक्तिगत आयुष्यातही त्याच तत्त्वावर मार्गक्रमण करता येऊ शकतं..... असं मला वाटतं..... दुसरं म्हणजे ध्येय साध्य झाली नाहीत..... तरी नाउमेद न होता तितक्याच जोमाने आपला मार्ग शोधत राहणं आणि पर्यायाने एका विशिष्ठ दिशेने आयुष्याची वाटचाल होणं अधिक महत्त्वाच आहे असं वाटतं......

    उदाहरण घ्यायचं म्हटलं तर..... जसे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हे टिळकांच स्वप्न वा ध्येय होतं..... ते त्यांच्या हयातीत पूर्ण झालं का? नाही..... पण त्या ध्येयासाठी त्यांच्या हातून जे महत कार्य झालं ते महत्त्वाचं..... अर्थात मोठ्या माणसांच्या गोष्टीच वेगळ्या....

    पण सामान्य माणसाने स्वतःसाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना..... त्याच्या आयुष्यातली असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी धडपड केली तरी.... त्याच्या आयुष्याला अर्थ येउ शकेल असे वाटते.... ॐ श्री गुरुदेव दत्त ......

    ReplyDelete
  3. Achieving GOAL is great ...but even moving in that direction with commitment and determined mind and efforts is important.... ॐ श्री गुरुदेव दत्त ......

    ReplyDelete