Friday 6 April 2012


स्पर्धा…. मी लवकर कसा यशस्वी होईन…….
आज आपण पाहतो सर्वत्र स्पर्धा आहे..... स्पर्धा तर जबरदस्त आहे..... अशा स्पर्धात्मक वातावरणात आजच्या तरुणाला करिअर घडवायचे आहे.... प्रत्येकजण घाईत आहे....  मी लवकर कसा यशस्वी होईन यात..... परंतु या गडबडीत आपण काही बेसिक नियम विसरू नयेत......

सकारात्मक विचार ...... एखादयाच मुख्य ध्येयावर आपली दृष्टी ठेवा...... कोणतेही काम करताना त्याचा सकारात्मक विचार करावा...... नकारात्मक विचारांचा आपल्या उत्साहावर व कृतीवर परिणाम होतो....... कुठलेही काम हलके समजू नये...... जगातले प्रत्येक काम हे श्रेष्ठच असते...... पण जो मनुष्य अंग मोडुन आपले कर्तव्य चोखपणे बजावतो.... तो यशस्वी होतो आणि त्याला अधिकाधिक कार्य करण्याची संधी मिळते.....

वेळेचे नियोजन…… वेळेची किंमत जाणणे हा सर्वात मोठा शहाणपणा आहे.......कोणत्याही यशस्वी माणसाचा नीट अभ्यास करा..... त्यातून आपण बरेच काही शिकू शकाल..... इतर माणसाइतकाच वेळ यशस्वी माणसाकडेही असतो..... पण तो त्या वेळेचे व्यवस्थित मॅनेजमेंट करुन अधिकाधिक वापर करतो...... आजचे काम आजच पुर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करा........ चालढकल, फाटे फोडणे यांतून काहीच साध्य होत नाही..... हे लक्षात ठेवावे........

नियोजन……. नियोजनामुळे कामाला बंदिस्तपणा येतो..... तीच यशस्वी प्रोफेशनलची ओळख आहे...... अशी माणसे विचारपुर्वक योजना आखून आपली कामगिरी यशस्वी करीत असतात...... एखादया कामाला सुरुवात केल्यानंतर कितीही अडचणी आल्या तरी ते पूर्ण करा..... परंतू त्यासाठी शॉर्टकर्ट वापरु नका......

संवाद ...... आपले विचार, आपली मते इतरांपर्यत आपण कसे पोहोचवतो यावर आपले यश अवलंबून असते........ एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल, समजली नसेल तर ती दुसऱ्याकडून शिकुन घ्यायची सवय लावा..... त्यात कमीपणा मानू नका......

निर्णयक्षमता ………. सुसंधी कोणाची वाट पहात नसते...... आणि गेलेली वेळही परतून येत नसते...... यासाठी कोणताही निर्णय वेळीच पूर्ण करा......योग्य वेळी योग्य निर्णय घेणे यातून आपली पात्रता दिसत असते....... यामुळे आपल्या प्रगतीतील अडसर दूर होतील...... आपली निर्णय क्षमता आपल्या यशाचा कालावधी वाढवतो.....
श्रवण क्षमता ……… उतावळीपणा बऱ्याचदा घातक ठरतो..... आपल्या संपर्कातील लहान मोठया व्यक्तींचे मत, म्हणणे ऐकुन घेण्याची सवय लावा.......व्यावसायिकतेसाठी इतरांचे ऐकून घेणे आवश्यक आहे......महत्वाचा नियम म्हणजे इतरांचे ऐकून घेणे यातून आपल्याला महत्वाचे टर्निग पॉइंटही मिळू शकतात......

जोखीम …… थोड्याफार प्रमाणात जोखीम उचललीच पाहिजे…… धाडसाने जोखीम उचलणारा यशस्वी होतो.......साहसीपणा हा गुणही आपण जोपासायला हवा...... जो जेवढी रिस्क घेईल, त्याला तेवढे जास्त यश मिळेल..........जोखीम उचला परंतु होणाऱ्या परिणामापासून बेसावध राहू नका...... बेसावधपणामुळे आयुष्याचे खूप नुकसान होऊ शकते...... अशा वेळी परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा व निराश न होता जोमाने कामाला लागा........आपल्या विचारात सकारात्मक बदल करुन मार्गात येणा-या छोटया मोठया अडचणींवर मात करा........

दिवसभराच्या नोंदी ..... तुम्ही दिवसभरात जे काही चांगले पाहाल किंवा ऐकाल...... त्यांची नोद डायरीत करुन ठेवा...... त्याचा तुम्हाला भविष्यकाळात निश्चितच फायदा होईल.....

ॐ श्री गुरुदेव दत्त ..........

No comments:

Post a Comment