Monday 2 April 2012


गुरुचा अनुग्रह कशाला हवा ………

अनुग्रह घ्यायचा म्हणजे आपण ध्येय (मोक्ष - भगवंत स्वरूपी प्राप्ती) ठरवायचे व ते प्राप्त करण्यासाठी गुरूच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करायचे..... अनुग्रह घ्यायचा म्हणजे आपण आपला प्रवास कसा करायचा ते गुरु कडून माहित करून घेणे....... अनुग्रह म्हणजे जीवनात यशस्वी होण्याचा योग मंत्र म्हणजे संकल्पप्रयत्न, अनुग्रह म्हणजेच यश होय...... ध्येयाशिवाय जीवन जगणे.... कोठे जायचे माहित नसतांना प्रवास करणे होय...... ध्येयच तुम्हाला तिथपर्यत पोहचण्याची क्षमता देतो...... आणि आनंदाने जगण्याची शक्तिही देतो......

आपल्याला ध्येय प्राप्त करण्याकरीता केवळ संकल्पच घेऊन चालत नाहि..... तर ते साध्य करण्याकरीता इष्ट प्रयत्न करणेही आवश्यक आहे..... या संकल्प व प्रयत्ना सोबतच गुरुचा अनुग्रहही आवश्यक आहे..... गुरु आपल्याला ध्येय देतात.... ते आपण गुरूंच्या अखंड अनुसंधानात राहून प्राप्त करायचे.... 

गुरुविना आपण अपूर्ण असतो.... गुरु भेट झाली कि आपणास पूर्णत्व लाभते.... आपणास कितीही अनुभव आले.... आपण कितीही काही जाणिले.... तरी गुरु शिवाय आपण कच्चे मडकेच असतो.... गुरुच आपले मडके पक्के करतो.... अनुग्रह देण्याआधीही गुरुची दृष्टी सर्वकाळ आपल्या शिष्यावर असते..... गुरु शिष्याच्या पात्रतेनुसार ध्येय देतात..... योग्य वेळ योग आल्यावर अनुग्रहाची कृपा होते.... 

गुरुंनी अनुग्रहानी आपणास त्यांच्या परंपरेत सामावून घेताना त्यांनी एक कुठली तरी साधना मंत्र योग दिला असेल....... तो साधना मंत्र योग म्हणजे स्वतःच्या साधनेने सिध्द केलेले जिवंत योग कृती असतात...... गुरुंनी असा सामर्थ्यवान योग मंत्र आपल्याला देऊन परमकृपा केलेली असते...... गुरुनी आपल्याला  अनुग्रह  देऊन व आपला अंगीकार करण्यात...... म्हणजे आपल्यात `स्वतःमध्ये स्वरुप ओळखायची क्षमता आहेहा विश्वास दाखविला आहे........ सद्‍गुरूंचा अनुग्रह मिळणे हा एक योग आहे.... 
 
मोक्ष परमार्थाची सुरुवात गुरूच्या अनुग्रहाने..... सद्‍गुरूच्या कृपेने होते..... परमार्थात अनुभव येण्यास सद्‍गुरूंची कृपा व्हावी लागतो..... कारण गुरु अनुभवी असल्याने ते आपल्याला तो अनुभव देऊ शकतात.... आपल्या शिष्याला आत्मज्ञानी बनवू शकतात.... आत्मज्ञानानेच स्वरुपाची ओळख आणि परमशांत अवस्था लाभते....

तसेच अनुग्रह घेतल्यावर काही बंधने येणारच....ती पाळावीत...... नाहीतर ध्येयप्राप्ती कशी होईल.......यात सद्‍गुरूंनी सांगितलेल्या साधनाचा अभ्यास करणे हे अत्यंत आवश्यक आहे...... त्यावरच सर्व काही अवलंबून आहे......

गुरूमंत्राच्या नियमित भजन जपाने...... साधनेने आध्यात्मिक प्रगती होते...... गुरूविन कोण दाखवील वाट ...... ते यासाठीच...... गुरुंच्याकृपेने हे सहज साध्य होते...... यासाठी वणवण भटकावे लागत नाही..... गुरुंचा अनुग्रह ही आत्मज्ञान प्राप्तीसाठीची पहिली पायरी आहे...... सद्‌गुरूंच्या कृपेने शिष्य या पायऱ्या सहज पार करतो...... शेवटी स्वरूप ज्ञाने.... मोक्षरूपी - परमशांती - परमात्म स्वरूपी प्राप्ती.....

ॐ श्री गुरुदेव दत्त.......

No comments:

Post a Comment