परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा.....
आज आपण पाहतो ताणामुळे काहीजण आनंदापासून वंचित रहातात..... काही तरुण वयातच व्यसनाधीन होत आहेत.... तर काही जण उत्तम गुण न मिळाल्यास निराश होऊन आत्महत्या करत आहेत.... मित्रांनो, विचार करा.... हेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे का ?
आज आपण पाहतो ताणामुळे काहीजण आनंदापासून वंचित रहातात..... काही तरुण वयातच व्यसनाधीन होत आहेत.... तर काही जण उत्तम गुण न मिळाल्यास निराश होऊन आत्महत्या करत आहेत.... मित्रांनो, विचार करा.... हेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे का ?
प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या क्षमता व मर्यादा यांची जाणीव ठेवायला हवीच ...... क्षमता आणि आकांक्षा यात खूप अंतर असल्यास व्यक्तीला अपेक्षाभंग होतो..... निराशा व मानसिक संघर्ष इत्यादी नकारात्मक भावनांना तोंड द्यावेच लागते...... प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस असतो..... तसेच आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते......
आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस जसे येतात तसे वाईट दिवसही येतच असतात..... कधी आनंद असतो तर कधी दु:ख असतं, कधी यशाचं शिखर तर कधी अपयशाची दरी.... आपण तर नेहमी म्हणतो की, मनुष्य जीवन म्हणजे ईश्वराने आपल्याला दिलेली सर्वात उत्तम, सर्वात किमती भेट आहे हो ना...? मग आपल्या अविचाराने आणि अतिरेकीपणाने एखादे कृत्य केले तर त्यामुळे आपले कुटुंब निराधार होत नाही का...?
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती - आत्मविश्वास...... अपयशाने खचू नका.... अधिक जिद्दी व्हा..... संभ्रमाच्या वेळी नेहमीच आपल्या कर्तव्याला ( आई / वडील / मुले / परिवार ) प्राधान्य द्या...... मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.....
आयुष्यात आपल्याला भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात...... तसेच आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही..... अशावेळी लक्षात ठेवा तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे....... परिस्थितीवर यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही...... ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये....
मी माझ्यासाठी आहे... त्यापेक्षा मी कुणासाठी तरी आहे... मी माझ्या आई-वडील / मुलांसाठी / कुटुंबासाठी आहे ही भावना ठेवावी...... काही गोष्टी आपल्याला प्रिय नसतानाही कराव्या लागतात कर्तव्य म्हणून..... आपली बाजू न्याय असेल तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात...... वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा...... प्रत्येक माणसाचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत:च असतो...... अन्यायापुढे मान झुकवू नका...... स्वाभिमानाने लढा...... फ्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा......
माणसाला परिस्थितीनुसार स्वत:च्या ध्येय किंवा आकांक्षेची पातळी कमी जास्त करता यायला हवी..... दुराग्रहीवृत्ती व अट्टाहास मानवी जीवनात केवळ दु:ख व निराशा निर्माण करत नाही.... तर मानसिक संतुलनात अडथळे निर्माण करून पुढील जीवनात मानसिक आजारी बनवतात.....
शेवटी काय तर .... आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल.... असं आपण सतत म्हणत असतो..... खरं असं, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही......आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच...... ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्चय करायचा हेच बरं नाही का..?
आताच्या परिस्थितीचे रुप बदलण्यासाठी अगदी मनापासून प्रयत्न करा...... आयुष्यात यशस्वी चांगले विचार निर्माण करा..... माणसे जन्मतात आणि मरतात, पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही........ परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा.... आपल्या आयुष्यात आपल्या हातून काही ना काही चांगल्या गोष्टी होतच राहणार आहेत..... त्यामुळे दुसऱ्यांचे देखील आपल्यामुळे काही ना काही कल्याण होणारच ही कल्पनादेखील आपणा प्रत्येकाला आनंद देऊ शकते....
आपणच या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे......
ॐ श्री गुरुदेव दत्त .....
No comments:
Post a Comment