Wednesday 11 April 2012

"मी"
मालवणी भाषेत एक म्हण आहे... "आप मेला, जग बुडाला" - आपण मेलो की सगळं संपलं... आपण मेलो की कुठल्याच भौतिक, भावनिक गोष्टीचा आपल्यावर परिणाम होत नाही...
यावर थोडे चिंतन केले तर असं लक्षात येतं की या "आप"ल्यातच काहीतरी गौडबंगाल दडलेलं आहे की जे संपूर्ण जगाचं कारण बनून राहिलंय... हे गौडबंगाल म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून माणसाचं "मन" आहे... कारण कोणत्याही कर्माची वासना ही पहिली मनात उत्पन्न होते तेव्हाच ती प्रत्यक्ष कृतीत उतरते...
विश्वनिर्मितीची वासना ही परमात्म्याच्या मनातच उत्पन्न झाली आहे... पण असं असूनही परमात्म्याचं मन हे त्याच्या इच्छेने चालत... त्याला वाटेल तेव्हा तो स्वतःच्या मनाची उत्पत्ती, स्थिती व लय घडवून आणू शकतो... कारण, तो ब्रह्मस्थितीत आहे...
मनात निरनिराळे विचार, वासना निर्माण होणं ही देखील परमेश्वराची "भन्नाट" योजना आहे...
पापपुण्याची वासना | तूच उपजविशी नारायणा |
आपुला रक्षिण्या मोठेपणा | पापी तूच निर्मिशी ||

या सगळ्यावर एकच पर्याय म्हणजे भगवद्गीतेवरील चित्र कायम मनात साठवून ठेवणे... त्या चित्रात अर्जुनाच्या रथाचे लगाम त्याच्या गुरूने म्हणजेच श्रीकृष्णाने आपल्या हातात ठेवले आहेत... तसेच प्रत्य्रेक जीवाचे, नव्हे चराचर सृष्टीचे लगाम केवळ भगवंतरुपी गुरुच्या हाती आहेत... हे एकदा समजले, की "मी" कुणीतरी आहे, सुख, दु:ख "मला" झाले हा भाव मरून जातो... हीच मोक्ष अवस्था आहे... 
ॐ श्री गुरुदेव दत्त... 


जीव वाचविणे हा माझा धर्म आहे...... बोधकथा.........

एकदा एक ऋषी नदीवर स्नानास गेले होते...... स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पाणी घ्यायला ते खाली वाकले तर त्यांना एक विंचू पाण्यात पडलेला दिसला...... तो विंचू पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता...... परंतु ते काही त्याला जमत नव्हते.......

ऋषींना त्याची दया आली..... त्यांनी त्या विंचवाला ओंजळीत उचलून घेतले व ते काठावर येण्यासाठी वळले तोच त्या विंचवाने जिवाच्या भीतीने त्यांच्या हाताचा चावा घेतला........ प्रतिक्षिप्त क्रियेने त्यांचा हातातून विंचू परत पाण्यात पडला...... ऋषींनी परत त्या विंचवाला उचलेले व परत काठावर येऊ लागले....... परत त्या विंचवाने हाताचा चावा घेतला. असे ३-४ वेळा तरी झाले...... एव्हाना ऋषींचा हात रक्तबंबाळ झाला होता......

हा सर्व प्रकार एक पांथस्थ बघत होता...... त्याला आश्चर्य वाटले...... विंचवाने एव्हढे चावे घेतले तरी ऋषी परत परत असे का करत आहेत ते त्याला कळेना....... त्याने त्या ऋषींना विचारले, "गुरुदेव, त्या विंचवाने आपला हात एव्हढा रक्तबंबाळ केला..... तरी आपण त्याला वाचवायचा एव्हढा अट्टहास का करत आहात?"..... ऋषी उत्तरले..... "चावा घेणे हा विंचवाचा धर्म आहे...... दुसर्‍याचा जीव वाचविणे हा माझा धर्म आहे...... जीव जात असताना पण तो त्याचा धर्म सोडत नाही..... तर मग मी का माझा धर्म सोडू....?

कथा – दुसरी.......

एकदा एक ऋषी नदीवर स्नानास गेले होते........ स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पाणी घ्यायला ते खाली वाकले तर त्यांना एक विंचू पाण्यात पडलेला दिसला........ तो विंचू पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता....... परंतु ते काही त्याला जमत नव्हते....... 

ऋषींना त्याची दया आली..... त्यांनी त्या विंचवाला ओंजळीत उचलून घेतले व ते काठावर येण्यासाठी वळले....... तोच त्या विंचवाने जिवाच्या भीतीने त्यांच्या हाताचा चावा घेतला....... प्रतिक्षिप्त क्रियेने त्यांचा हातातून विंचू परत पाण्यात पडला....... ऋषी नदीकाठी परत आले....... आपला कमंडलू उचलला....... परत पाण्यात गेले, विंचवाला कमंडलूत उचलले व जमिनीवर आणून सोडले.......

बोध:
दोन्ही गोष्टींमधे दोन्ही ऋषींनी आपला धर्म सोडला नाही....... परंतु पहिल्या ऋषींनी धर्म आंधळेपणाने आचरणात आणला....... धर्म असे कुठेच सांगत नाही....... कि दुसर्‍याचा जीव वाचवताना स्वतःला त्रास झालाच पाहीजे.......... हे दुसर्‍या ऋषीने जाणले होते व तेच आचरणात आणले........

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment