Monday 2 April 2012


स्वामी स्वरुपानंदकृत संजीवनी गाथा..... अभंग ......

सद्गुरु गणनाथ उदार समर्थ घाली नयनांत ज्ञानांजन
सहज-समाधि सापडले धन लांचाविले मन तया ठायी
चालता बोलता ढळे आसन भंगे ते मौन, कदा काळी
स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद लागलासे छंद स्वरुपाचा

स्वामी स्वरुपानंदकृत संजीवनीगाथेमध्ये सद्गुरुस्तवनपर अनेक अभंग आहेत. आज घेतलेला अभंग त्यापैकीच एक आहे..... वरील अभंगामध्ये आपल्या गुरुंचे हे कर्तृत्व स्वानुभवाने जाणून घेऊन स्वामी म्हणत आहेत: .... माझे सद्गुरु गणनाथ (श्रीसंत गणेशबाबामहाराज ) ह्यांनी माझ्या नयनांमध्ये ज्ञानरुपी अंजन घालून आपला समर्थपणा आणि उदारपणा दाखविला आहे..... त्या अंजनाद्वारे मला सहज-समाधि हे स्वतःमध्येच खोल पुरलेले धन सापडले आहे...... आणि माझे मन त्याचा उपभोग घेण्यासाठी ललचावले आहे......  संसारामध्ये चालताना आणि बोलताना माझी योगावस्था अचळ आहे..... आणि स्वरुपामध्ये मग्न राहण्याच्या स्थितीच्या छंदात मी कधीही कमी होणारा आनंद उपभोगीत आहे........

सद्गुरु उदार आणि समर्थ का आहेतस्वामींनी गुरुंबद्दलची कृतज्ञता व्यक् करण्याकरीता ठेवलेला निकष व्यावहारिक आपत्तींपासून सुटका झाली हा ठेवलेला आढळून येत नाही.... स्वामी गणनाथांना उदार आणि समर्थ म्हणत आहेत कारण त्यांनी डोळ्यांत ज्ञानरुपी अंजन घातले म्हणून...... हे दिव्य अप्राप्य अंजन त्यांच्याकडे मुबलक उपलब्ध आहे म्हणून ते समर्थ आहेत...... आणि त्यांनी माझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवता मला त्याचे दान केले म्हणून उदार आहेत......

लौकीक दृष्टीने स्वामींचे आयुष्य दिव्य होता उलटे संकूचितच झाले होते...... अशावेळी मी गुरु करुनही माझ्यावर अनाकलनीय व्याधीची आपत्ती कशी कोसळली.... हा दुर्विचार त्यांच्या मनात येता त्या व्याधीचा आधार घेऊन त्यांनी व्यावहारीक जगातून आपले मन संपूर्णपणे काढून घेतले..... भगवंताच्या स्मरणात,...... सोऽहम्साधनेच्या छंदात...., ते मग्न झाले..... अंगावर आलेली व्याधीसुध्दा गुरुकृपाच आहे..... अशी त्यांची खात्री होती..... त्यांच्या या अविचलीत श्रध्देमुळे आपल्यावर आलेल्या संकटामागचा भगवंताचा उद्देश्य त्यांना ज्ञात झाला.... आपल्या सद्गुरुंच्याबद्दलची त्यांची कृतज्ञता वृध्दींगत झाली...... म्हणजे ज्या घटनेने आपल्यासारखे सर्वसामान्य जन गुरुंच्या कृपेबद्दल साशंक होतात त्याच घटनेद्वारे त्यांना खरी गुरुकृपा म्हणजे काय.... याचे दर्शन घडले......

स्वामी सांगतात....

ज्ञानांजन पडता नयना होती असह्य वेदना
म्हणून सोडाल स्वसाधना गमवाल सहजसमाधि धना

स्वामी म्हणतात.....गुरुनी हे ज्ञानांजन घातल्यावर ते सहन करा... तिथेच तुमची  परीक्षा आहे..... नाहीतर जे मिळवले आहे ते गमावून बसाल....    आपण आपल्या अज्ञानात सुखी असतो... पण ते सुख सद्गुरुंना आवडत नाही.... ते आपणास सत्य परीस्थितीचे ज्ञान देतातच..... म्हणून स्वामी म्हणत आहेघाली नयनात ज्ञानांजन’..... आपले डोळे भोवतालची परीस्थिती आहे.... तशी बघण्यास समर्थ बनविण्याचे कौशल्य आपल्या गुरुंच्या हातात आहे.....

आपले सद्गुरुही आपणास संसाराचे सत्य स्वरुप दाखवायला सुरुवात करतात......सत्य परीस्थिती भयावह असल्याने सत्य कळले की आपल्याला सुख होता वेदना जाणविता....... म्हणून या ज्ञानालाअंजनअसे म्हटले आहे..... सत्याचे ज्ञान हे गुलाबपाण्यासारखे शीतल, सुखावह नसून एखाद्या औषधाप्रमाणे झणझणणारे आहे....... आणि फक् बाह्य जगातील दोष आपणास दिसायला लागतात असे नव्हे तर आपले स्वतःचे दोषदेखील स्पष्टपणे कळायला लागतात......

थोड्या भाविकांना अध्यात्माच्या मार्गावर पाऊल ठेवण्याआधी स्वतःबद्दलचे खरे ज्ञान असते.....  स्वतःचे आयुष्य आहे तसे डोळ्यासमोर दिसायला लागते तेव्हा आपली जी मानसिक कुचंबणा होते ती सहन करण्याचे धैर्य सगळ्यांत असतेच असे नाही...... मग डोळ्यात घातलेले हे ज्ञानांजन आपण काढून टाकतो...... आणि एव्हढी साधना करुनही मनाची शांति मिळत नाही तर काय उपयोग असा विचार करुन दुसऱ्या गुरुंच्या मागे लागतो..... हे झणझणीत ज्ञानांजन सहन करण्याची ताकद नसते......

संसारात पुढे जाण्याकरीता ज्याप्रमाणे आपण शाळा-कॉलेजात जाऊन पदवी प्राप्त करतो त्याचप्रमाणे बहुतांशी लोक गुरु करतात.......   मग आयुष्यभर आपल्या संसारातील प्रत्येक आपत्तीचे निवारण सद्गुरुंनी करावे ही भावना मनात राहीली तर धोका उत्पन्न होतो....... स्वतःच्या जीवनात श्रीगुरुंना उच्च स्थान देऊन त्यांच्याभोवती कोंडाळे करुन फिरणाऱ्यांमध्ये फारच थोड्या लोकांचा गुरुशक्तीचा निकष संकट आले तरी मन शांत रहावे ही शक्ती मिळावी असा असतो...... आलेले संकट निघून कसे गेले यामध्येच ते गुरुंचा महिमा मानतात. ....आपले सध्याचे अस्तित्व आहे त्यापेक्षा अधिक परिपूर्ण गुरुंमुळे कसे झाले या कृतज्ञतेमध्ये....  त्यांच्याकडून गुरुंच्या खऱ्या सामर्थ्याची उपेक्षा होत आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही.......  गुरूला ओळखा.... गुरुकडून कवडीमोलाची अपेक्षा धरू नका......

गुरु वर अढळ श्रद्धा जरुरी आहे ..... स्वामींचे अंगावर आलेली व्याधीसुध्दा गुरुकृपाच आहे अशी  स्वामींना खात्री होती.... त्यांच्या या अविचलीत श्रध्देमुळे आपल्यावर आलेल्या संकटामागचा भगवंताचा उद्देश्य त्यांना ज्ञात झाला आपल्या सद्गुरुंच्याबद्दलची त्यांची कृतज्ञता वृध्दींगत झाली...... म्हणजे ज्या घटनेने आपल्यासारखे सर्वसामान्य जन गुरुंच्या कृपेबद्दल साशंक होतात..... त्याच घटनेद्वारे त्यांना खरी गुरुकृपा म्हणजे काय याचे दर्शन घडले.....  सोहम साधनेत ते मग्न झाले..... स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद लागलासे छंद स्वरुपाचा ........

  श्री गुरुदेव दत्त ..........

No comments:

Post a Comment