Monday 2 April 2012


साधना सुत्र..... नामसाधना .....

मनाचे श्लोकाच्या' सुरुवातीलाच श्री समर्थ रामदासांनी हे " साधना सुत्र " म्हणजेच ' नामसाधना ' कशी करावी.... हे अतिशय सोप्या शब्दात सांगितल आहे...... ज्या इतर श्लोकामधे 'मना' असा उल्लेख आहे...... त्या श्लोकात वरिल साधनेचि 'फ़लश्रुती' सांगितलेली आहे..... हे फळ ....'नामसाधना' चालु केल्यानंतरच आपोआप मिळणारे असे आहे..... हे लक्षात ठेवावे .....

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा / पुढें वैखरी राम आधी वदावा //

सदाचार हा थोर सांडू नये तो / जनीं तोचि तो मानवी धन्य होतो //

परमेश्वर प्राप्तीकरता......श्रीसमर्थ रामदासांनी वरिल श्लोकात सांगितलेले 'मूळ साधनासूत्र' असे..... प्रभाते, म्हणजेच पहाटे, सुर्योदया अगोदर शक्य झाल्यास ब्राम्ह्यमुहूर्तावर ( पहाटे ३.३० ते ६ वा.)..... एका ठराविक वेळेला.... एका ठराविक ठिकाणी .... ठराविक आसनावर ( बैठक ).... सुखासनात बसून..... म्हणजे तुम्हाला जास्त वेळ बसायला त्रास होणार नाही या पद्धतीने ....नाहीतर काय होते आपले लक्ष साधनेपेक्षा.... शरीराकडेच जास्त होते..... डोळे मिटून, मनातल्या मनात 'नामसाधना' ( नामचिंतन, नामस्मरण ) करावे.....कमीत-कमी १ तास तरी ' साधना ' करावी......

पुढे म्हणजे....त्यानंतर.... दिवसभरात इतर रोजची कामे करताना..... अखंड  नामस्मरण' करत रहावे...... हा वरिल सदाचार  ( साधना, हरिपाठ ),  थोर-महान आहे..... त्यामूळे 'हा' सदाचार (साधना) कधीही  ' सांडू '  नये..... फ़क्त एवढ्या गोष्टिंचे पालन आळस सोडून..... नियमितपणे केले तर....  साधकाला 'श्रीराम'  प्राप्ती हमखास होतेच...... आणि त्याचे जीवन 'धन्य' होते...... अशी ग्वाही श्रीसमर्थ रामदासांनी त्यांच्या अनूभवातूनच दिली आहे........

सदाचार हा थोर सांडू नये तो..... ह्या ओळीत " सांडू " नये अस सांगितल आहे.......सांडण आणि सोडण यातील फ़रक लक्षात घेण्यासारखा आहे......उदा.- आपल्या हातून दूध चुकून असावधपणे ....... अजाणतेपणी-अज्ञानाने सांडत...... तर ' सोडण '  हे जाणूनभूजून होत...... यासाठी साधकाने सावध असणे जरुरी आहे......


ॐ श्री गुरुदेव दत्त ...........




मना सज्जना हीत माझें करावें ......

मना सज्जना हीत माझें करावें | रघुनायका दृढ़ चित्ती धरावे ||
महाराज तो स्वामि वायुसुताचा | जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ||

समर्थांनी या श्लोकामध्ये मनाला "हीत माझें करावें" असे विनवले आहे......कोणते हीत..? तर माझा चित्तात सदॆव श्रीरामाचे वास्तव्य असावे .......सतत त्याचेच चिंतन मनन आणि स्मरण चित्तामध्ये दॄढ असावे यासाठी समर्थ मनाला आळवित आहेत.......मानवी मन असे आहे की ते ज्याचा ध्यास घेते त्याचाच सतत पाठपुरावा करते.......ज्याचा ध्यास घेतला असेल तेच मन:पटलावर उमटत रहाते.......या भौतिक जगातील मायानगरीत वावरताना सामान्य जीवाला भगवंताचे विस्मरण होउन या मायेचाच मोह पडतो.........याचा अर्थ असा नव्हे की या सगळ्याकडे पाठ फ़िरवुन उपभोगशून्य आयुष्य जगावे.......

पण याचा आस्वाद घेताना विवेक जागा ठेवावा........धन, पॆसा ही गोष्ट अशी आहे की तो कीतीही मिळाला तरी त्याच्या प्राप्तीची लालसा संपत नाही........आज तर अशी परिस्थिती आहे की भरपूर पॆसा मिळवून त्याचा उपभोग घेण्यासाठी देखील माणसाला वेळ मिळत नाही.......आणि सगळे मिळवून देखील असमाधान आणि अशांती यालाच त्याला जास्तित जास्त सामोरे जावे लागते.......हे सर्व करत असताना त्याची "मी" पणाची भावना अधिक बळावलेली असते...... हा अहंकारच त्याच्या नाशाला कारणीभूत ठरतो......

अहंकाराने मनुष्य अल्पज्ञानावर "मी मोठा जाणता आहे" या भ्रमात वावरतो....समर्थ म्हणतात.....मोडा अहंतेचें पुंडावें ... विवेकें देवास धुंडावें..... मना, रे सज्जना, स्वत:चे हीत कर, फायदा कर की रघुनाथाला, रघुकुलाच्या स्वामीला घट्ट धरून ठेव ......त्यातच कल्याण आहे .. उठता- बसता, चालता - बोलता, खाता- पिता, एव्हढेच नव्हे तर निद्रेत देखील रामाचाच ध्यास घे! रामालाच आपलेसे कर......

सर्व प्राप्त होउन देखील असमाधानीवृत्ती, इतरांविषयी द्वेष, मत्सर, ईर्षा, दुष्टबुध्दी या सर्वापासुन दूर राहून हे मना सतत श्रीरामाचा ध्यास चित्तामध्ये धर असे समर्थ आवर्जुन सांगतात....श्रीरामाचा ध्यास म्हणजे त्याच्यातील गुणांचा ध्यास.......ज्याचे आचरण आपल्या कडुन व्हावे अशी समार्थांची अपेक्षा आहे..... 

महाराज तो स्वामि वायुसुताचा जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा

पवनपुत्र हनुमान ज्यांचा दास आहे....., तिन्ही लोकांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे त्या श्रीरामाला सतत चित्तात धारण कर.... असे समर्थांचे मनाला सांगणे आहे.......समर्थांनी स्वत:च्या जीवनात श्रीरामचंद्र आणि हनुमान यांची उपासना केली......या दोन दॆवतांवर त्यांची अत्यंतिक श्रध्दा होती.......श्रीरामाचा लाडका दास हनुमंत समर्थांचे परमप्रिय दॆवत होते...........

एखाद्या दॆवाताची उपासना करावयाची म्हणजे त्याच्या गुणांचे चिंतन करून ते आपल्यामध्ये बाणावयाचे ही खरी उपासना समर्थांना प्राप्त झाली होती.......श्रीरामभक्त हनुमान हे एक अष्टपॆलू व्यक्तिमत्त्व होते.......निर्भय वक्तॄत्त्व... अफ़ाट स्मरणशक्ती..... लाभलेला रामाचा दास अत्यंत निर्मळ अंत:करणाचा होता.......चंचल वायुचा पुत्र हनुमंताला मनोवेगाने कोठेही पोहोचता येत असे.......पण अत्यंत ज्ञानी असल्यामुळे स्थिरबुध्दी हा त्याचा विशेष.......त्याच्या या गुणांमुळे त्याने श्रीरामाच्या मनात स्थान प्राप्त केले.......हनुमंताचा जो स्वामी श्रीराम तिन्ही लोकांचा उद्धार करण्यास नेहमी कार्यरत असतो.......अशा या रघुनायकाला दृढ़ चित्ती धरावे असे समर्थांचे सांगणे आहे.....
ॐ श्री गुरुदेव दत्त.........

No comments:

Post a Comment