Thursday 26 April 2012

स्वतःला ओळखा... जीवनात फक्त चालू नका.. भरारी घ्यायला शिका ..... 

एक राजा होता.... त्याला दोन सुंदर बहिरी ससाणा पक्षी भेट मिळाले... इतके छान ससाणा पक्षी त्याने पहिले नव्हते..... पक्षी लहान होते... पक्षी त्याने त्याच्या पक्षी शिक्षकाकडे ट्रेनिंग साठी पाठीवले..... असाच एक महिना गेला...

एक दिवस पक्षी शिक्षक राजाकडे आला व म्हणाला... कि दोघांपैकी एक ससाणा आकाशात छान झेपावतो.... उंचच उंच भरारी घेतो .... विहार करतो.... पण दुसरा ससाणा काही उडत नाही..... इथे आल्या पासून तो एकाच फांदीवर बसून आहे ..... राजाने लगेच उत्तमोत्तम पक्षी तज्ञ, पक्षी डॉक्टर बोलाविले.... पण कोणीच त्या ससाण्याला उडायला शिकवू शकले नाहीत .....

राजाने हा प्रश्न दरबारात ठेवला व मंत्र्याना उत्तर शोधण्यास सांगितले..... दुसऱ्या दिवशीही ससाणा फांदीवरच बसून होता ... राजाला कळले कोणालाच उत्तर मिळालेले नाही.... शेवटी राजाने विचार केला कि एखाद्या निसर्गाच्या जवळ असलेल्या, निसर्ग ओळखणाऱ्या व्यक्तीला हे काम देऊया... 

त्याने एका गावातल्या हुशार शेतकऱ्याला बोलावले..... दुसऱ्या दिवशी राजा एकदम आश्चर्य चकित झाला... दुसरा ससाणा देखील आकाशात मस्तपणे विहार करत होता ..... राजा खुश झाला त्याने शेतकऱ्याला हे कसे केले विचारले.... शेतकरी म्हणाला ..... हे फारच सोपे होते.... मी फक्त तो बसलेला फांदी कापली....

आपले देखील असेच असते... आपण सर्वजन उंचच उंच भरारी घेऊ शकतो..... पण आपल्याला आपणातील नैसर्गिक क्षमतांची माहिती नसते..... आपण फक्त असेच एका फांदीवर बसून राहतो.... नवीन काही करायला भितो... घाबरतो .... व आपल्याच माहित असलेल्या गोष्टीमध्ये अडकतो... नवीन काही शिकत नाही....

आपण आपल्या क्षमता, कौशल्य, बुद्धिमत्ता यांचा पुरेपूर वापर करत नाही..... स्वःताचा सर्वांगीण विकास करत नाही..... खूपवेळा आपणच आपल्या क्षमता, कौशल्य ओळखत नाही..... किंवा जाणून घेत नाही ....

आपण संसारात साचेबद्ध, निरर्थक असे आयुष्य जगतो .... जेव्हा कि आपण स्वःताला ओळखून परिपूर्ण, अर्थपूर्ण व आनंदी असे राहू शकतो.... आपल्याला मिळालेल्या या मानवी देहाचे सार्थक करा.... स्वःताला ओळखण्याचा प्रयत्न करा......

तर मग चला आपली क्षमता कळण्यासाठी आपण ज्याला चिकटून बसतो.... ती फांदी तोडायलाच पाहिजे.....  हि भीतीची फांदी कापायला शिका व ज्ञानाकडे भरारी घ्या आणि जीवनात मुक्तपणे विहार करण्याचा आनंद लुटा.....

ॐ श्री गुरुदेव दत्त .......

2 comments:

  1. आपली क्षमता कळण्यासाठी आपण ज्याला चिकटून बसतो.... ती फांदी तोडायलाच पाहिजे..... ॐ श्री गुरुदेव दत्त ......

    ReplyDelete
  2. सांस्कृतिक, कौटुंबिक, सामाजिक भूमिकांच्या बंधनात आपण रुतून बसतो...... त्यामुळे विकासाची गती मंद होते..... आपली स्थिती फांदीवर चिकटून बसलेल्या बहिरी ससाण्यासारखी होते ...... हा ‘मेंटल ब्लॉक’ जोपर्यंत त्या फांदीसारखा तोडून टाकत नाही...... तोपर्यंत स्वत:च्या कर्तृत्वाची आणि क्षमतेची आपल्याला कल्पना येऊ शकत नाही..... दुसऱ्यावर अवलंबून राहणं किंवा आकस्मिक गरजेला किंवा आपत्तीला आधार शोधत परत फिरणं चालूच राहील...... ती मानसिक अवलंबून राहण्याची वृत्ती सोडली पाहिजे...... आपली सबल स्थानं आणि क्षमता जाणून घेण्यासाठी हि घट्ट धरलेली फांदी सोडली पाहिजे...... खूप संधी आहेत..... पण आपण त्या शोधू शकत नाही..... कारण फांदी सोडली की.... असुरक्षितता घेरते.... म्हणून ती फांदी तोडली तरच आपण अवकाशाचा भेद करू शकतो...... ॐ श्री गुरुदेव दत्त ......

    ReplyDelete