Wednesday, 25 April 2012

मुक्तविहार व बंधविहार ......

एक पक्षी आकाशात विहार करीत होता..... तो एका झाडावर बसला होता.... तेथे त्याला एक खाद्य पदार्थ मिळाला.... तो आनंदित झाला..... तो पदार्थ चोचीत धरुन पुन्हा आनंदाने विहार करु लागला.....
आकाशात इतर पक्षीही उडत होते..... ते लगेच त्या खाद्यपदार्थासाठी त्याच्या मागे लागले.....

हळुहळु बरेच पक्षी त्यात सामील झाले..... आता कर्कश्य आवाजात सारे जण त्या पदार्थासाठी त्याचा पाठलाग करु लागले.... तो पदार्थ चोचीत धरलेला पक्षी घाबरला..... चोच उघडुन ओरडुही शकत नव्हता.... कारण पदार्थ खाली पडला असता... आणि इतरांना त्याला तो द्यायचा नव्हता.... जीव तोडुन तो उडत होता..... हुलकावण्या देत होता कारण तो पदार्थ त्याचा जीव की प्राण होता.....

आता त्या पक्ष्याच्या मनातील ताण वाढत चालला होता.... धडधड वाढली.. त्या पदार्थामुळे त्याचा आनंद हळु हळु कमी होत चालला होता..... पण पाठीमागे लागलेले पक्षी त्याचा पिच्छा सोडत नव्हते.... आणि एका क्षणी त्याने निर्णय घेतला की जाउ दे ना..... एवढाच काय जीव अडकवायचा त्या पदार्थात द्या टाकुन..... असा विचार करत त्याने तो पदार्थ चोचीतुन सोडुन दिला.....

आणि सारे पक्षी आता त्या पदार्थाकडे वळले..... या पक्ष्याचा पाठलाग सोडुन दिला..... हा पक्षी पुन्हा मुक्तपणे व निर्भयतेने आकाशात विहार करु लागला..... अन्य मधुर फळांचा आस्वाद घेउ लागला....

आता त्याला एक सत्य गवसले.... की जरी आपल्याला तो पदार्थ मिळाला नाही.... तरी आपण आता स्वतंत्र आहोत..... अधिक आनंदी आहोत..... बाकीचे मात्र त्या पदार्थासाठी मारामारीच करत आहेत.... आणि गगनातील विहार करायचे विसरले आहेत...... आता ते बंधनात आहेत आपण मात्र मुक्त व आनंदी आहोत.......

यावरून आपण हाच बोध घ्यायचा.... आपल्या ह्या जीवनयात्रेत एकेक पाऊल पुढे टाकावयाचे आहे..... मग जे पदरात पडेल ते स्वीकारायचे..... जे निसटेल ते सोडायचे आणि पुन्हा पाऊल पुढे टाकत राहून मुक्कामाचे स्थान गाठावयाचे आहे.....

ॐ श्री गुरुदेव दत्त .....

No comments:

Post a Comment