अपयशाचा उपयोग यश प्राप्तीकरता होऊ शकतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.....
आज आपण पाहतो .... प्रत्येक ठिकाणी स्पर्धा...... अशा या स्पर्धेच्या युगात तणावाला तोंड देताना मानसिक संतुलन राखणं..... म्हणजे आणखी एक तणावच असतो..... अशावेळी मानसिक संतुलन बिघडू शकते ..... म्हणूनच आज मानसिक रूग्णांचं प्रमाण फार वाढलेलं आहे....स्पधेमुळे आपण सर्वजण जीवनात वेगवेगळे मुखवटे घालून वावरत असतो..... जास्त मेकअप लावल्यास त्याला जसे तडे पडतात, तसेच तडे आपल्या व्यक्तिमत्त्वाला पडतात.... आपण हुशार नसताना.... खूप हुशार आहोत असा आव आणला की आपल्या मनावर ताण पडतो..... आपल्या व्यक्तिमत्त्वातील सहजता नाहीशी होऊन आपले मानसिक संतुलन धोक्यात येते....
त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या क्षमता व मर्यादा यांची जाणीव ठेवायला हवी...... क्षमता आणि आकांक्षा यात खूप अंतर असल्यास व्यक्तीला अपेक्षाभंग... निराशा व मानसिक संघर्ष इत्यादी नकारात्मक भावनांना तोंड द्यावे लागते......
त्यामुळे व्यक्तीला परिस्थितीनुसार स्वत:च्या ध्येय किंवा आकांक्षेची पातळी कमी जास्त करता यायला हवी..... दुराग्रहीवृत्ती व अट्टाहास मानवी जीवनात केवळ दु:ख व निराशा निर्माण करत नाही.... तर मानसिक संतुलनात अडथळे निर्माण करून पुढील जीवनात मानसिक आजारी बनवतात.....
जीवनात घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबरच हवा असा आग्रह करू नये..... कालांतराने यापैकी काही निर्णय चुकल्याची जाणीव होते..... पण आपल्या हाती आता करण्यासारखे काहीचे नसते...... अशावेळी त्याबद्दल खंत न करता केवळ आपला निर्णय योग्य नव्हता.... ही जाणीव ठेवल्यास आपण स्वत:ला किंवा इतरांना दोष देण्याची चूक करणार नाही व त्यामुळे आपले मानसिक संतुलन ढळणार नाही..... लक्षात ठेवा ..... जीवनातील कोणत्याही कार्यात अपयश हा अपरिहार्य भाग आहे.....
आपणास सर्वच क्षेत्रात यशस्वी व्हायला आपल्याला आवडते..... यशाचे अत्युच्च टोक गाठल्यानंतर कोणतीही व्यक्ती त्या स्थानावर नेहमीकरता राहू शकत नाही..... जीवनात येणाऱ्या अपयशांमुळे प्रयत्न करणे सोडणे हे देखील बरोबर नाही..... अपयशाचा उपयोग यश प्राप्तीकरता होऊ शकतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.....
शेवटी काय तर .... आपली धडपड असते आपल्या आयुष्यातील सुखासाठी....आनंदात असण्यासाठी..... आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल.... असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो..... खरं असं, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही...... यश - अपयश येतच राहणार ..... आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच...... ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्चय करायचा हेच बरं नाही का..?
ॐ श्री गुरुदेव दत्त ......
या बाबतीत नेमके होते काय……. दुसऱ्याचे यश ऐकून पाहून आपण कुढत बसतो...... समजा दोघेही समव्यवसायी असल्यास एकमेकांकडून शिकण्यासारखे असते..... त्याचेही रेस्टॉरंट आहे, आपलेही तेवढय़ाच तोलामोलाचे आहे...... मग तिथे खवय्यांची वर्दळ जास्त का आहे...? याचा तपास करणं हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे....... समोरच्याचे प्रयत्न, कष्ट आपण समजावून घेत नाही...... यशाचा मार्ग फार सोपा आहे, असे जगातील जाणकार म्हणतात....... जे तुम्ही करता ते जीव ओतून करावे...... गुंतागुंतीचा व्यवहार न करता सोपा मार्ग निवडावा......

यशही तुमचेच आहे, अपयशही तुमचेच आहे .....
यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत...... यशानंतर अपयश येतं अथवा अपयशानंतर यश येतं हे तपासणं म्हणजेच तुमच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्व विकासाचा शोध घेणं होय....... यश आधी त्यानंतर अपयश प्राप्त होतं किंवा अपयश आधी त्यानंतर यश प्राप्त होतं हे सांगणं कठीण आहे....
तसंच या यशाची आणि अपयशाची सुरुवात आपल्याकडून होते.... यशही तुमचेच आहे, अपयशही तुमचेच आहे...... कारण दोन्हीही यश- अपयश तुमच्याकडूनच तुम्हाला मिळाले आहे, हे नाकारून चालणार नाही.... यश कधी येते.... ? आणि अपयश कधी येते....?
यश आले तर आपली मेहनत, योग्य नियोजन, कष्ट याचा हमखास आपण विचार करतो आणि आपणच आपली पाठ थोपटतो...... अपयश आले की, दैवाच्या पुडीत त्याला बांधतो..... दैवाने साथ दिली नाही, हा विचार आपण करतो...... यश-अपयशात ज्ञान- परिस्थिती, अनुभव इच्छाशक्ती, प्रयत्न, नियोजन, गुंतवणूक, मेहनत , परिश्रम, संवाद, अशा अनेक गोष्टींचा समावेश करता येतो...... जे ज्ञान आपल्याकडे आहे त्याचा वापर कसा करतो या अगदी मूलभूत गोष्टी आहेत आणि सरळसुद्धा आहेत......
या बाबतीत नेमके होते काय……. दुसऱ्याचे यश ऐकून पाहून आपण कुढत बसतो...... समजा दोघेही समव्यवसायी असल्यास एकमेकांकडून शिकण्यासारखे असते..... त्याचेही रेस्टॉरंट आहे, आपलेही तेवढय़ाच तोलामोलाचे आहे...... मग तिथे खवय्यांची वर्दळ जास्त का आहे...? याचा तपास करणं हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे....... समोरच्याचे प्रयत्न, कष्ट आपण समजावून घेत नाही...... यशाचा मार्ग फार सोपा आहे, असे जगातील जाणकार म्हणतात....... जे तुम्ही करता ते जीव ओतून करावे...... गुंतागुंतीचा व्यवहार न करता सोपा मार्ग निवडावा......
जगातली यशवंत माणसं कशी यशस्वी झाली...? याचा प्रथम शोध घ्या..... त्यांच्यावरचे लिखाण वाचा...... त्यासाठी चिंतन फार महत्त्वाचे आहे...... इच्छा- कृती आणि योग्य नियोजन करा म्हणजे माणूस अपयशी होत नाही....... एखादा माणूस यशाच्या शिखरावर पोहोचला म्हणजे कसा पोहोचला, कुठून आला..? त्याचे झिजणं.... त्याचे कष्ट समजावून घ्या....
आता यांत्रिक युगात जगात सगळीकडे त्याचे करिअर होऊ पहात आहे...... जपानमध्ये एक म्हण आहे....... त्याचा भावार्थ असा - यश- अपयश हे एकाच नदीचे किनारे आहेत...... श्रम न करता नदीत मासे पकडणे हा फार मोठा गुन्हा आहे.... असा गुन्हा कधी करू नये..... आणि असा गुन्हा (श्रम न करण्याचा) केलाच तर आयुष्यभर अपयशाच्या पायरीवर बसावे लागेल......
ॐ श्री गुरुदेव दत्त ......
No comments:
Post a Comment